Posts

नवी पिढी नव्या वाटा

Image
पुस्तकांच्या पानांवरुन  आत्ता डिसेंबरमधे Pune Book Festival च्या निमित्ताने माझी पुस्तक दिवाळी साजरी करुन झाली. त्यातलं एक पुस्तक वाचायला मी स्वतः खूप उत्सुक होते ते म्हणजे नवी पिढी नव्या वाटा हे डॉ. प्रकाश आमटे यांचं पुस्तक, ज्याचं शब्दांकन गौरी कानेटकर आणि प्रीती छत्रे यांनी केलं आहे. कुष्ठरोगी बांधवांच्या जीवनात आनंद फुलवणारे महान समाजसेवक म्हणून बाबा आमटे सर्वांना परिचीत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या पुढच्या पिढीने समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. डॉ. विकास व भारती आमटे आनंदवनचा प्रकल्प उत्तमपणे सांभाळत आहेत. तर डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनी गडचिरोली येथील भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी लोकबिरादरी प्रकल्पामार्फत भरीव काम केलं आहे. या कामाची दखल घेऊन या उभयतांना २००८ साली आशियातील नोबेल मानले जाणाऱ्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८५ साली बाबा आमटेंनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. एकाच घरातील दोन पिढ्यांना समाजकार्यासाठी सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार मिळणे, ही विशेष कौतुकाची गोष्ट आहे. डॉ. प्रकाश आ...

वंदे गुरू परंपरा

Image
वैभवशाली सनातन परंपरेला समर्पित १० वर्षे एखाद्या YouTube channel ची दहा वर्षे पूर्ण झाली, याचा ते चॅनेल ज्याचं आहे तो सोडून बाकी कुणालाही मनापासून आनंद होणं ही एक फारच rare गोष्ट आहे. कारण आज हर तऱ्हेच्या content creators चा अगदी सुकाळू आहे. तुमची जी आवड असेल त्या दिशेने तुम्हाला अक्षरशः खेचून नेणारा content तुम्हाला इथे दिसेल. अशा काळात जो बिकता है वही यहा टिकता हैं असा अघोषित मूलमंत्र असणाऱ्या या माध्यमाचा विधायक कामासाठी वापर करुन नावारूपाला आलेलं चॅनेल म्हणजे कुलदीप मुरलीधर पै यांचं चॅनेल जे Vande Guru Parampara या spiritual music series साठी ओळखलं जातं.  मूळचे केरळचे कुलदीपजी भारतीय शास्त्रीय संगीतातले गोल्ड मेडलिस्ट आणि साउंड इंजिनियर आहेत. ते स्वतः व्हायोलिन, पियानो, मृदुंग, हार्मोनिअम, बासरी ही वाद्ये उत्तम वाजवतात. अद्वितीय या त्यांच्या अल्बममधे त्यांनी गायनाबरोबर व्हायोलिन, मृदंग, घटम, कांजिरा, तबला, हार्मोनियम आणि मेलोडिका या वाद्यांचं वादनही केलं आहे. पण २०१४- १५ पासून त्यांनी आपले गुरु स्वामी श्री रमणचरण तीर्थ यांच्या प्रेरणेतून सुरु केलेल्या ' वंदे गुरू पर...

आयदान- उर्मिला पवार

Image
      आजवर वाचलेल्या आत्मचरित्रांचा विचार केला तर ते कुणी लिहिलं आहे, यावरुन त्यात कोणता मजकूर जास्त वा कमी असेल याचा आधीच अंदाज बांधता येतो. लिहिणारी “ती” असेल तर तिचं बालपण, पालक, भावंडं, त्यापुढे लग्न, नवऱ्याचं कुटूंब, तिथले हरतऱ्हेचे नातेसंबंध, संसारातील सुखाचे क्षण आणि वादळे हा भाग तर हटकून असतोच आणि जास्त प्रमाणात असतो. आत्ता वाचलेलं पुस्तक माझं हे निरीक्षण खरं ठरवतं. पण यात वर नमूद केल्यापेक्षाही दोन अधिकच्या आणि विशेष गोष्टी आहेत. एक म्हणजे लेखिका मूळची born and brought up in कोकण म्हणजे रत्नागिरीतील फणसवळे आणि सासरकडून सिंधुदुर्गातील भिरंवडेकडची असल्यामुळे सुरुवातीच्या भागात अस्सल कोकणी लाल मातीचा गंध जाणवतो. आणि हे एका विचारी दलित स्त्रीनं लिहिलेलं आत्मचरित्र असल्यामुळे बालपणापासून ते अगदी वृद्धापकाळापर्यंत वेगवेगळ्या तऱ्हेने आणि वेगवेगळ्या वाटेने जातीभेद तिच्या आयुष्यात कसा झिरपत गेला, ते दाखवून देण्यात लेखिका यशस्वी ठरली आहे.  हे पुस्तक आहे उर्मिला पवार यांनी लिहीलेलं आयदान. आयदान म्हणजे आपल्या संसारात बांबूपासून तयार केलेली सूपं, रोवळ्या, परद्या, हारे, क...

पुरुषः अस्वस्थ रहस्याचा शोध

Image
पुरुषः अस्वस्थ रहस्याचा शोध मराठी वाचकाला निखळ अभिमान वाटावा अशी एक सातत्यपूर्ण साहित्यीक परंपरा म्हणजे दरवर्षी प्रकाशित होणारे वेगवेगळ्या विषयांवर आधारित दिवाळी अंक. रसिक वाचकांसाठी विचारांची आणि मनोरंजनाची पर्वणी हे दिवाळी अंक गेले काही वर्षे उपलब्ध करुन देत आहेत. यावेळी प्रथमच एक दिवाळी अंक अखंड अगदीं अथ ते इती वाचून काढला. कारण त्याचा विषय आणि मांडणी. लोकमतचा २०२३ सालचा दीपोत्सव अंक. विषय पुरुष- ‘अस्वस्थ’ रहस्याचा शोध. संपादक अपर्णा वेलणकर यांची मुद्देसूद आणि संवेदनशील प्रस्तावनाच या विषयाची व्याप्ती समजून घ्यायला उपयोगी पडते. त्या म्हणतात, “ पुरुष हा प्राणी सध्या एकूणच ‘ आरोपीच्या पिंजऱ्या’त उभा आहे आणि त्याला सबळ कारणेही आहेत. पण तरीही त्याच्या खांद्यावर हात टाकून ‘ मित्रा, तू कसा आहेस?’ असा एक साधा, प्रांजळ प्रश्न आपण विचारु शकतो का, आणि त्या प्रश्नाला जी खरी उत्तरे मिळतील, ती तशीच्या तशी ऐकण्याची, समजून घेण्याची आपली तयारी असेल का?...” हाच विचार या अंकाची जुळवणी करताना त्यांनाही पडला होता. पुढे तर त्यांनी पुरुषांची एक वर्गवारीच दिली आहे. स्त्री पुरुष समानतेचे सूत्र समजून उमजून...

Unmarriageable by Soniah Kamal

Image
It is a truth universally acknowledged, that once you fall in love with Jane Austen, you are forever a 'Janeite'. Countless re-reading of her texts, frantic devoration of her screen or book adaptations, constant admiration for her mighty craft and literary production are some of the qualities of Janites what make them what they are. Janites don't only delve deeper into this little Austenian ocean of letters, they add much more to it. Just like Shakespeare, she doesn't tell us only stories, she has given us some universal patterns which will never go out of picture; but always seen and felt. That is why we have some beautiful modern texts created as a tribute to Jane Austen as well as original works having their own worth and say.  There are literally countless adaptations of almost all her novels. But one particular novel that tops the list is Pride and Prejudice- evergreen classic story of spirited, sharp witted Elizabeth Bennet and an honourable gentleman Fitzwilliam ...

द लिजंड ऑफ बहिर्जी - नाईक ( सुरतेवर छापा - पुस्तक पहिले

Image
द लिजंड ऑफ बहिर्जी - नाईक ( सुरतेवर छापा - पुस्तक पहिले) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध गुप्तहेरांच्या महान कारवायांची आणि मराठा साम्राज्याच्या उदयाची कहाणी सन १६६३. शिवाजी राजांच्या चिमुकल्या स्वतंत्र स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी उत्तर दक्षिणेकडे शत्रू सरसावून बसले आहेत. नुकताच मुघल सुभेदार शाहिस्तेखान पुण्यात त्याच्या सर्व सैन्यानिशी तळ ठोकून बसला आहे. स्वराज्यासाठी तन मन धन अर्पण करायला सज्ज मावळ्यांच्या नशिबी ‘ रात्रंदिन युद्धाचा प्रसंग’ आहे. यांना ही लढाई किती वेळ चालणार ठाऊक नाही. पण आहे तो शिवाजीराजेंवर असणारा ठाम विश्वास. राजे आपण उभं केलेल्या स्वराज्याची वाताहात होत असताना पाहत आहेत. ते दुःख आणि जोडीला मात्र वेगळ्याच विवंचना आहेत. सततच्या लढायांनी त्रस्त सरदार आता मुघलांशी तह करायचा सल्ला देत आहेत. तर स्वराज्याची आर्थिक स्थिती इतकी ढासळली आहे, की सैन्याला वेतन देण्याइतकेही पैसै शिल्लक राहिलेले नाहीत. अशा डळमळीत परिस्थितीत राजांनी जातीने छापा घालून शाहिस्तेखानाला शास्त केली. पण अजूनही समस्या संपल्या नव्हत्या. स्वराज्य पुन्हा उभं करायचं होतं, त्यासाठी लागणारं प्रचंड आर्थ...

तुका 'राम' दास

Image
तुका ‘राम’ दास नावाचा महिमा किती मोठा हे काही पुस्तकांकडे बघूनच कळतं. वरती तुका मधे राम खाली दास तुका ‘राम’ दास असं चमत्कृतीपूर्ण नावाचं पुस्तक मला वाचायला मिळालं, याबद्दल माझं मलाच खूप कौतुक आहे. तसे आपले संत परंपरेतील सगळेच संत वंदनीय आहेत, पण माझा personal लोभ ज्यांच्यावर आहेत ते दोघे तुकाराम महाराज आणि समर्थ. यांचं, यांच्यावर लिहिलेलं कितीही साहित्य वाचावं, तरी ते कमीच. ‘ सिंधू न मावे रांजणी’ तसा प्रकार. या संतांनी आपल्या आयुष्यभराची साधना खर्ची घालून आपल्यासारख्या “पामरांच्या” दृष्टीला पुरेल इतकं बोधांजन तयार करुन ठेवलं आहे. आपण फक्त तिथवर पोहोचलं पाहिजे. पण आपण आधुनिक एकविसाव्या शतकात राहणाऱ्या so called साक्षर आणि प्रगत लोकांनी या संतांना विशिष्ठ जाती, समजुतींच्या चौकटीत अडकवून ठेवलं आहे. यातून बाहेर पडून खरा नीरक्षीर विवेक दाखवून बुद्धीच्या कसोटीवर जोवर आपण हे साहित्य पडताळून पाहत नाही, तोवर आपण फक्त साक्षरच असू, सुशिक्षीत नव्हे. हे साध्य करण्यासाठी या संतांच्या लोकप्रिय असणाऱ्या प्रतिमेपलीकडे जाऊन त्या व्यक्तीचं साहित्य, वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी घेतलेली भूमिका उलगडून सांग...

मनाचिये द्वारी

Image
मनाचे श्लोक लहानपणी कानावर पडलेले. शाळेत एकसुरात श्लोक म्हटल्याचं आठवतं. पुढे psychology चा अभ्यास करताना मनाचे श्लोक वेगळ्या अर्थी समजत गेले. कधीही जरा relax व्हावंसं वाटलं, तर रविंद्र साठेंच्या घनगंभीर तरीही थेट काळजापर्यंत पोहोचणाऱ्या आवाजातले मनाचे श्लोक ऐकणं हा एक उत्तम पर्याय माझ्याकडे असतो. का माहीत नाही, पण हे श्लोक मनाला भावतात. त्यांची ओळख पटते. आत्ताच ग्रंथालयात सच्चिदानंद शेवडे लिखीत मनाचिये द्वारी हे पुस्तक मिळालं. एकूण २०५ मनाच्या श्लोकांचं एकेक करुन सुंदर निरुपण केलेलं आहे. त्यामुळे हे compulsorily वाचलंच पाहिजे, असं पुस्तक आहे.  या पुस्तकात मूळ श्लोक, त्याचा अर्थ आणि विवेचन असा क्रम ठेवला आहे. हे पुस्तक पूर्वी महाराष्ट्र टाईम्स आणि नवशक्ती वृत्तपत्रांतून आलेल्या सदराचं पुस्तकी रूप आहे. लिहीत असताना त्या काळी लिहिलेले श्लोक आजच्या चंगळवादी, भौतिक पातळीवरच अधिक जगणाऱ्या, स्वमग्न माणसाच्या आयुष्यातही कसे लागू पडतात, यावर भर दिलेला आहे. विवेचन करताना स्वामी वरदानंद भारती लिखीत ‘ मनोबोध’, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, नामदेव गाथा, प्राचीन ग्रंथ- स्तोत्र - कथा या...

लेखकाची गोष्ट

Image
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पुस्तकांच्या उंच भिंतीवर बसलेला एक माणूस दिसतोय. त्याच्या उंचीला आधार त्याने वाचलेल्या पुस्तकांचा आहे. भविष्यात मला माझं असं एक चित्र काढून घ्यायला नक्कीच आवडेल!  " लेखक म्हणजे भानात येणं. लेखक होणं म्हणजे केवळ भाषा कमावणं नाही. लेखक म्हणजे पर्सनल ओळखीपाळखी वाढवणं नाही. लेखक म्हणजे सुहास्य वदनानं साहित्य क्षेत्रातल्या ज्येष्ठांना वंदन करणं नाही. लेखक होणं म्हणजे भोळ्या भाबड्या वाचकांमध्ये मिरवणं तर अजिबातच नाही..." मग लेखक म्हणजे काय ते सांगतायत स्वतः एक लेखक!  लेखकाची गोष्ट:  अ सर्व्हायवल गाईड फॉर मराठी रायटर्स  या नावातच अशी काही जादू आहे, की कुठलाही क्युरियस वाचक हे नक्की हातात घेईल. पुस्तकाच्या नावाचं आणि मुखपृष्ठाचं महत्त्व पटवून देईल, असं हे पुस्तक. लेखक विश्राम गुप्ते वाचकांच्या कोर्टात एक लेखक म्हणून आपली बाजू मांडायची रीतसर परमिशन घेतात. या कोर्टातले जज म्हणजे सगळे वाचक, म्हणून त्यांना युवर ऑनर असं संबोधून सुरु होतं हे एक हटके अपील!  फर्स्ट ऑफ ऑल, मला या पुस्तकाच्या टायटलबद्दल थोडं सांगावंसं वाटतं. विश्राम गुप्ते चरित...

एका खेळियाने

Image
एका खेळियाने कितीदा आपुले जाळे विणीयेले उंच जागी !  दिलीप प्रभावळकर यांचं एका खेळियाने वाचतेय. असे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके नट आहेत, की ज्यांच्याबद्दल तुम्हाला निखळ कौतुक आणि अभिमान वाटतो. त्या नटाने केलेल्या त्या भूमिकेत तुम्ही अन्य कोणाला imagine करूच शकत नाही. या लोकांकडे स्वतःचा कसदार, मेहनतीने अंगात मुरवलेला अभिनय असतो. 2 मिनिट्स instant magggi सारख्या झटपट acting च्या आणि actors च्या गर्दीत ही अशी मंडळी विरळच. त्यातले दिलीप प्रभावळकर. खूप सहज, मनमोकळेपणाने त्यांनी आपले अनुभव सांगितले आहेत. शिवाय ते एक अभिनेते आहेत, याची त्यांनाही पूर्ण जाणीव असल्याने आपली अभिनयाची कारकीर्द डोळ्यापुढे ठेवून त्यांनी हे अनुभव documented केले आहेत. घरातली एखादी आदरणीय बुजुर्ग व्यक्ती जशा सुरुवातीपासूनच्या आठवणी सांगते, तसा फील वाचताना येतो.  प्रत्येक वेळी नवी भूमिका  नवं आव्हान म्हणून त्यांनी स्वीकारली. त्यांच्या कितीतरी भूमिका प्रचंड लोकप्रिय अक्षरशः cult level पर्यंत पोहोचल्या तरी जात्यावर पीठ  काढल्यासारखं त्या भूमिकेने दिलेल्या लोकप्रियतेचं पीठ काढून ती enc...

Jonathan Livingston Seagull by Richard Bach

Image
Take a dive in the Literature Ocean, you will find many precious gems waiting for you!  I am very proud of one specific reading habit that I have, is whenever I come across any new book title or author while reading, I immediately search for it and give it a try. This is my way of widening my reading circle. In one beautiful Marathi book I read just yesterday, I read about this novella- Jonathan Livingston Seagull by Richard Bach, published in 1970, written in three parts, with beautiful illustrations.  Richard Bach is an American author who served in the United States Navy and the New Jersey Air National Guards fighter wing. That is a reason why flying is a constant theme in his writing. His books are mainly autobiographies inspired from his life events. The protagonist of this novella is a seagull - Jonathan Livingston Seagull. He lives with his flock, tries to obey all rules, yet he is distinct from his flock because his wants to fly higher. He just does not want to limit ...

Love in the Time of Cholera

Image
Two young lovers who are madly in love with each other are separated due to some factors out of their control. After almost half a century, their destiny gives them one ultimate chance to rekindle their emotions. But can love survive so long?  A novel, written by Colombian Nobel Prize-winning author Gabriel García Márquez in 1985, depicts this unusual, still quite relatable love story of Florentino Ariza and Fermina Daza. It feels like their story is not written but woven intricately into the fabric of time. Novel begins in the present when Fermina 's husband Dr. Urbino, one of the prominent figures in his town, a respected physician, dies in an accident. Almost the entire town gathers at their house to pay homage to him, who has given significant service to society for more than 60 years. There is also Florentino in the crowd, who looks after important arrangements of funeral, helps in every way possible, puts forward his proposal one more time to Fermina, now a widow who lived a ...

मंतरलेला इतिहास

Image
      खूपदा आपल्यासमोर इतिहासाची मांडणी एका इतिहासनायकाला केंद्रस्थानी ठेवून केलेली असते. त्यामुळे त्या नायकाच्या कर्तृत्वाला त्यात अधिक महत्त्व प्राप्त होतं. पण वि. का. राजवाडे म्हणतात, " केवळ मोठ्या माणसांची चरित्रे म्हणजे इतिहास नव्हे". अनेक लहान थोरांनी आपापल्या परीने कष्ट, हालअपेष्टा सोसून, मर्दुमकी गाजवत हा इतिहास घडवलेला असतो. शिवाय इतिहास हा केवळ स्वामीनिष्ठांचाच नसतो, जोडीला तो दगलबाज संधीसाधू सत्तापिपासूंचाही असतो.                   किती भोगी उद्दाम हापापलेले                  कुणी त्यागमुर्ती विरागी निराळे                  महाकाल हे सर्व पोटात घेतो                  तयांच्या कथांचा इतिहास होतो  हे सूत्र हर्षद सरपोतदार लिखीत मंतरलेला इतिहास या पुस्तकात ठळकपणे जाणवतं. वेगवेगळ्या काळातील विविध व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या एकूण २४ लेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. अगदी ...

Appreciation post- आशा बगे

Image
      Serendipity म्हणजे अचानक एखादी खूपच मोलाची गोष्ट हाती लागणे, हे कधीही कुठल्याही बाबतीत शक्य आहे. एखादं दर्जेदार पुस्तक अचानक हाती लागलं तर आनंद होतोच, पण एखाद्या दर्जेदार लेखकाची ओळख झाली, तर हिऱ्याची खाण सापडल्यासारखं वाटतं. आशा बगे हे नाव मला अगदी गेल्या महिन्यापर्यंत माहीत नव्हतं, आणि आता मला सर्वार्थाने आवडलेल्या लेखकांच्या यादीत त्यांचं नाव मला जोडावंच लागेल. स्त्रीवादी लिखाणात दोन्ही टोकं टाळणारं लिखाण मला वाचायला आवडतं. म्हणजे बाई म्हणून कशी मी बिचारी, त्यागाची मूर्ती, सोशिकतेचा मेरुपर्वत असलं काही मला शिसारी आणतं. त्याउलट स्त्रीत्व ही काहीतरी फार मोठी बेडी आहे, ती तोडून भिरकावून दिली पाहिजे वगैरे असलं काही असंबद्ध, कृत्रिम वाटतं. माझ्या कल्पनेतली स्त्री तिचं स्त्रीत्व तिला जमेल तसं जपत, साजरं करतच पुढे जात असते. ती पुरुषांशी स्पर्धा करत नाही, ती स्वतःशीच स्पर्धा करते कारण तिला कुणाला हरवायचं नाहीये, तिला स्वतःला जिंकायचं आहे. हे सगळं करत असताना एक मुलगी, बहीण, बायको, सून,आई, सासू ,आजी,मैत्रीण अशा सगळ्या भूमिका तिला पार पाडायच्या आहेत. या दोन्ही गोष्टी साधतान...

Mr. Darcy's Diary

Image
It is a fact universally acknowledged, that once you fall in love with Pride and Prejudice , there is no way to return! I remember reading this novel as a student for the first time in college. With a passage of time, it has become even more relatable to me. I cannot decide whom I love more- the most splendid couple of all times Elizabeth and Darcy or Jane Austen for creating them?  It is always a pleasure to rediscover, reread this novel. Even a single meme about it delights me. Recently I come across this book- Mr. Darcy's Diary by Amanda Grange. An idea to see Pride and Prejudice from Mr. Darcy's angle  is ever compelling, and I have to admit, I am very pleased!  Jane Austen is known for creating so many unique personalities, who are so perfect, remarkable, that reinterpreting them is indeed a hard task to do. Mr. Darcy with all his pride, his inner conflict, his evolved personality with time, his reserved exterior, his unique brand of being a gentleman is a constant ...

देवबाभळी: प्राजक्त देशमुख

Image
"एक देवाची बायको, एक भक्ताची बायको. मुळात त्यांची ओळख म्हणजे ' त्या कुणाच्या तरी बायका आहेत ' इथेच त्यांचं अधांतरी असणं दिसून येतं आणि खटकतं. त्यांचं स्वतंत्र म्हणणं काय असेल? त्या कुणावर चिडत असतील तर त्यांचा आवाज कसा असेल? त्यांचे कामानंतरचे सुस्कारे किती दीर्घ असतील? हे सगळं सगळं कुणी का मांडलं नाही की कुणाला दिसलंच नाही? ग्रंथच्या ग्रंथ तुकोबा आणि पांडुरंगावर लिहिलेले असताना त्यांच्या पाठीशी पाठ लावलेल्या आकृत्यांकडे कुणाचंच लक्ष कधी का गेलं नाही? निदान प्रदक्षिणा मारताना तरी? "        विठू माउली ये हाची वर देई संचारोनी राही हृदयामाजी हीच विनवणी वारंवार करणारे, संसाराचं मोहजाल भेदून परम चैतन्यरुपाशी एकरुप व्हायला निघालेले तुकोबा; घरादारावर, मुलाबाळांवर जीवापाड माया करणारी, आपल्या नवऱ्याला भक्तीचं वेड लावणाऱ्या देवाचा सतत पाणउतारा करणारी, पण अशा जगावेगळ्या नवऱ्याचा जगावेगळा संसार मनोभावे करणारी आवली ही एक अद्भुत जोडी. देवाचं नाव घेत भंडाऱ्याच्या डोंगरावर किंवा इतर कुठेही जरी गेले असले, तरी त्यांना शोधून पोटभर भाकरी खाऊ घातल्याशिवाय आवली स्वस्थ बसायची नाही. अशीच एक...

शिष्टाईचे इंद्रधनू

Image
      कधी कधी बातम्यांत आपले विदेश सेवेतले अधिकारी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कुठल्यातरी occasion ला भारताकडे बोट दाखवणाऱ्या, विनाकारण डिवचू पाहणाऱ्या अन्य देशांच्या प्रतिनिधींची सविनय खरडपट्टी काढताना दिसतात. त्यांचं एखादं विधान, कृती पुढचे अनेक दिवस चर्चेत राहते. आपले सर्वोच्च नेतेही अशा अधिकाऱ्यांचं नीट मन लावून ऐकताना दिसतात, तेव्हा शिष्टाई ( diplomacy) या शब्दाची व्याप्ती लक्षात येते. तसं अगदीं जुन्या काळापासून रामायणातील अंगद शिष्टाई, महाभारतातील श्रीकृष्ण शिष्टाई ते अफझलखान भेटीदरम्यानची बोकील पंतांची शिष्टाई किती आणि काय काय साधून गेली, ते सर्वश्रुत आहे. आपली एक समजूत असते, की हे लोक चिक्कार पगार घेतात आणि त्यांना परदेशात निवांत राहायला मिळतं, मानसन्मान मिळतो. पण त्याच जोडीला त्यांना अहर्निश आपल्या देशाची त्या देशात असणारी प्रतिमा आणि स्थान बुलंद राखणं हेच त्यांचं मुख्य काम असतं. यांची एक चूक थेट दिल्लीपर्यंत हादरे पोचवू शकते. अनिवासी भारतीयांच्या बाबतीतले सगळे प्रश्न हाताळणं, कित्येक आंतरराष्ट्रीय करार प्रत्यक्षात राबवणं अशा नानाविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात तेही क...

Animal Farm-George Orwell

Image
      All animals are equal, but some animals are more equal than others.” Groundbreaking piece of literature, one of its kind, a novella of less than 100 pages written in 1945 by George Orwell,is a fable,more accurately,a veiled political satire.You might wonder how anyone can satirize a political system in less than 100 pages, but after reading this book you will realize that there is nothing which is not included in the novella.         The beauty of this novella lies in the fact that if you go on reading it as it is without any background information of certain political movements or revolution, you will enjoy it as an animal fable. It tells the story of a group of farm animals who revolt against their keeper. They want to create a place where all animals are treated equally and where they can be free and happy. They succeed in chasing their owner Mr. Jones away from the farm, and renaming it as an Animal Farm. This time, it is the pigs...

प्रेरणा आणि अंधारातले दिवे

Image
   तुम्ही वाचक असल्यामुळे "एखादं पुस्तक suggest करना' या प्रश्नाचा तुम्हाला कायमच सामना करावा लागतो. त्यातलं कुठलंही पुस्तक सांग, किंवा तुझं सगळ्यात आवडतं पुस्तक सांग असं कुणी म्हटलं तर त्याला उत्तर कसं आणि काय द्यायचं ते ठरवणं एक कसोटीच असते. त्यातही कॉलेजच्या मुलांना किंवा त्यापेक्षाही लहान असणाऱ्या मुलांना वाचायला आवडेल आणि त्यांना काही inspiring मिळू शकेल अशी पुस्तकं असणं आणि ती आपल्याला माहीत असणं या दोन्ही गोष्टी मला खरंच खूप मोलाच्या वाटतात. यावेळी वाचलेली दोन्ही पुस्तकं याच गटात शोभतील अशी आहेत. पहिलं - प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखीत प्रेरणा आणि दुसरं अरुणा ढेरे लिखीत अंधारातले दिवे .        काही नावांची आपल्याला इतकी खात्री पटलेली असते, की यांनी लिहिलेली ओळ न ओळ वाचण्यासारखी आहे, असं आपण ठामपणे सांगू शकतो. मी दहावीच्या सुट्टीत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं दीपस्तंभ आणि जागर वाचलं होतं. 'जीवन त्यांना कळले हो' या बा भ बोरकरांच्या पंक्ती खऱ्या अर्थानं जगलेल्या माणसांची ओळख झाली, यांच्यासारखं जगता आलं पाहिजे याची जाणीव झाली. तेव्हापास...

माणूस आणि नॉट गॉन विथ द विंड

Image
#पुस्तकांच्या_पानांवरुन मला दोन ते तीन तास रिकामा वेळ मिळाला, तर मी काय करेन, याचं उत्तर ठरलेलं आहे. एखादं छानसं पुस्तक घेईन आणि वाचायला लागेन. अगदीच टाळणं शक्य नसेल तर आणि तरच माझ्याकडून movies बघितल्या जातात. म्हणजे आवडत नाही असं नाही, पण priority त्यालाच असेल असं होत नाही. मी चित्रपट या गोष्टीवर प्रेमाने बोलणं म्हणजे टकल्यांच्या गावात कंगव्याचा खप होण्याइतकं अनपेक्षित आहे. पण नुकत्याच वाचलेल्या दोन पुस्तकांनी मला चित्रपट या माध्यमाशी जुळवून घ्यायला हवं, असा काहीसा धडा देऊ केला आहे.      चित्रपटसृष्टी हीच मुळात उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांची मांदियाळी आहे. इथे अनेक चेहरे येतात, काही चमकून जातात. उदंड तारे तारका आणि अगदी थोडकेच ध्रुव!  अशा या कीर्ती, संधी, यश यातल्या कोणत्याच बाबतीत कसलीच शाश्वती नसणाऱ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणे, अधिराज्य गाजवणे हेही दिग्विजय केल्यासारखं आहे. पण अशा होऊन गेलेल्या तरीही अविनाशी असणाऱ्या दिग्विजयी कलाकार आणि कलाकृतींचा आढावा घेणारं पुस्तक म्हणजे फ्लॅशबॅक: चंदेरी दुनियेत माणूस . संस्थापक संपादक श्री ग माजगावकर यांच्...