Posts

गानयोगी: पं. द. वि. पलुस्कर

Image
#पुस्तकांच्या_पानांवरून  २०२१:पर्ण सातवे गानयोगी :पं. द. वि. पलुस्कर कट्यार काळजात घुसली नाटक पहिल्यांदा टीव्हीवर पहिलं, तेव्हापासून अभिजात संगीताची वेगवेगळी घराणी, त्यांची शैली याविषयी मला आकर्षण आहे. पुढे Bandish Bandits आणि Darbarfestival चॅनेलवरचे व्हिडिओ पहिल्यापासून या आकर्षणात अजूनच भर पडली. पूर्वी मोठमोठ्या राजे रजवाड्यांच्या,संस्थानिकांच्या पदरी अनेक गुणी कलावंत असत. राजाश्रय मिळत असल्यामुळे इतर भौतिक गोष्टींची चिंता न करता ते सूरसाधना करू शकत. मग हे राजमहालातलं गाणं लोकाभिमुख कसं झालं, कुणी केलं, अनेक पिढ्यांच्या योगदानामुळे ही घराणी कशी निर्माण होत गेली, राजाश्रय ते लोकाश्रय हा विलक्षण प्रवास कसा काय घडला ही माहिती मला हवी होती. आणि माझ्या सुदैवाने माझ्या असंख्य प्रश्नांचं उत्तर मला दिलं ते अंजली कीर्तने लिखीत गानयोगी: पं. द. वि. पलुस्कर या पुस्तकाने!  'जब जानकीनाथ सहाय करे तब' याचे गायक यापलीकडे मला बापूराव यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. पण आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तृत्व वाचल्यापासून अंजली कीर्तने यांच्या लिखाणाबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण झाल...

एम टी आयवा मारू: अनंत सामंत

Image
#पुस्तकांच्या_पानांवरून २०२१: पर्ण सहावे # एम_टी_आयवा_मारू : समुद्राच्या लहरीवर चाललेल्या मानवी आयुष्याचा थरार!  नावात काय आहे या उक्तीला खोटं ठरवणारी कादंबरी असंच या कादंबरीचं वर्णन मी सुरूवातीला करेन. मी कधीच आपणहून ज्या विषयावरचं लिखाण वाचलं नसतं, ते या चमत्कारिक नावामुळे या कादंबरीकडे आकर्षित होऊन वाचलं. लॉर्ड जीम, हार्ट ऑफ डार्कनेस, मॉबी डिक, ओल्ड मॅन अँड द सी, रायडर्स टू द सी अशा समुद्र आणि माणसांच्या आंतरसंघर्षाचं चित्र रेखाटणाऱ्या अतिशय लोकप्रिय कादंबऱ्या, नाटकांच्या पंक्तीत शोभून दिसेल अशी ही कादंबरी आहे. एम टी आयवा मारू या काहीशा चमत्कारिक नावाचा अर्थ तसा हटकेच आहे. एम टी म्हणजे मोटर टँकर, मारू म्हणजे जहाज पण एम टी आयवा मारू या जपानी शब्दांचा एकत्रित अर्थ प्रेम आणि एकरूपता यांच्या भावूक चेतनेचे जहाज!  सुरुवातीलाच नावाइतकीच मनात घर करून गेली, ती या कादंबरीची अर्पणपत्रिका आणि प्रस्तावना. या दोन्हींतून खलाशांच्या संघर्षाला, समुद्राला जी काही भावोत्कट मानवंदना दिली आहे, त्याला खरंच तोड नाही ! मी आजवर वाचलेली सगळ्यात सुंदर अर्पणपत्रिका आणि प्रस्तावना आयवा मार...

गीतरामायण

Image
#पुस्तकांच्या_पानांवरुन  २०२१: पर्ण पाचवे अजाणतेपणी केंव्हा माता घाली बाळगुटी बीज धर्माच्या द्रुमाचे कण कण गेले पोटी छंद जाणतेपणीचा, तीर्थे काव्याची धुंडिली कुण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली... गीतरामायणाचे सूर घुमले नाहीत, असं एकही मराठी घर नसेल. गीतरामायण म्हणजे शुभंकर संस्कारांचं पाथेय ! महासागरासारखी व्याप्ती असणारी रामकथा केवळ ५६ गीतांच्या माध्यमातून शब्दबद्ध करणाऱ्या गदिमा तथा गजानन दिगंबर माडगूळकर आणि त्या गीतांना आपल्या श्रवणीय सुरांचे अलंकार चढवणाऱ्या बाबूजी तथा सुधीर फडके यांचे मराठी रसिकांवर अनंत उपकार आहेत. १९५५ साली पुणे आकाशवाणीचे सीताकांत लाड यांना धार्मिक किंवा नैतिक थीमवर आधारित लोकांना आवडेल, असा एखादा कार्यक्रम करायचा होता. त्यासाठी त्यांनी गदिमांना विचारणा केली. (म्हणजे तसं बघायला गेलं तर खरंच गदिमांनी गीत रामायण लिहावं ही रामाचीच इच्छा होती म्हणायची!) दोघांनी मिळून रामायणावर आधारित कार्यक्रम करायचा असं ठरवलं. गदिमा गीतं लिहितील, आणि बाबूजी संगीत दिग्दर्शन करतील आणि दर शुक्रवारी एक एक गाणं आकाशवाणीवर प्रसारित केलं जाईल हे ठरलं. आणि १ एप्रिल १९५५ साली 'स्वय...

द्रोहपर्व : अजेय झणकर

Image
#पुस्तकांच्या_पानांवरून २०२१: पर्ण चौथे #पुस्तक_परीक्षण #ऐतिहासिक_कादंबरी "... काका... वाड्यात पाहा हो कशी धूम करुन मारामारी करतात. म्हणून आलो. तुम्हीच हा फितूर केला ना काका... तुम्हीच हा फितूर केला. तुम्हांस काय पाहिजे ते देतो पण हे गारदी समजावून वाटेस लावा. राज्य घ्या हवं तर. मला कैदेत घालून सुखानं राज्य करा पण त्यांना आवरा...ते पहा ते आले. त्यांना आवरा. काकाऽ ऽ मला वाचवा. मला वाचवा काकाऽऽऽ मला वाचवा... मधे पडून चापाजी टिळेकर, नारोबा फाटक यांनी आपला जीव गमावून आपल्या धन्याला वाचवायचा प्रयत्न केला पण... काही क्षणांत महंमद युसुफ, सुमेरसिंह आणि तुळाजीचे वारावर वार पडले. दोन...चार... छेऽऽऽ नारायणरावांच्या देहाचे जवळजवळ आठ- दहा तुकडे इकडे तिकडे विखुरले होते..." मराठी वाचकांना नारायणराव पेशवे माहीत आहेत, ते केवळ "काका मला वाचवा" आणि आनंदीबाईंनी त्यांच्यासाठी लिहिलेल्या पत्रात "ध चा मा केला" एवढ्याचसाठी. हे नाट्य माहीत असलं तरी प्रत्यक्षात तेव्हा काय घडत होतं, आणि मुख्य म्हणजे पेशव्यांचा अशा प्रकारे खून झाल्यावर त्याने राजकारणाला कशी वेगळीच कलाटणी मिळाली, याचा ...

रहस्यभेद पूर्वार्ध आणि उत्तरार्ध ( लेखक गो. ना.दातारशास्त्री)

Image
#पुस्तकांच्या पानांवरुन २०२१: पर्ण तिसरे #रहस्यकथा # रहस्यभेद विविध साहित्य प्रकारातले लघुकथा आणि रहस्य कथा हे दोन प्रकार मला अधिक लक्षवेधी वाटतात. उत्स्फूर्तपणे सुचणारं काहीतरी ' a piece of life' या चौकटीत बसवून शब्दांची मर्यादा सांभाळत एक सुसंबद्ध गोष्ट निर्माण करणं यातून लघुकथेचा आविष्कार होतो. आणि रहस्यकथा लिहिणे म्हणजे कोळी ज्याप्रमाणे एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदुपर्यंत आपलं जाळं विणत जातो, तशा प्रकारे एक कल्पना, एक रहस्य विस्तारत नेणं. किचकट जाळं विणताना कोळी त्या जाळ्यात स्वतः अडकत नाही, तसंच रहस्यकथा लिहिताना लेखकाला प्रत्येक बारकाव्याबद्दल अखंड दक्ष राहावं लागतं. जिगसॉ पझलमधे जसं शेवटचा तुकडा त्याच्या जागेवर बसल्याशिवाय चित्र पूर्ण होत नाही, तसं एक एक बारकावा कथासूत्रात नीट गुंफल्याशिवाय रहस्यकथा परिपूर्ण होत नाही.  यावेळी वाचलेली रहस्यकथा आहे गोविंद नारायण दातार शास्त्री यांनी लिहिलेली रहस्यभेद ही दोन भागांत विभागलेली कादंबरी . विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठी वाचकांत दातार शास्त्री हे नाव शालिवाहन शक, इंद्रभुवनगुहा, विलासमंदिर, विश्वनाथ,कालिकामूर्ती, प्रवाळद्वीप,...

पृथ्वीचे प्रेमगीत ( कुसुमाग्रज)

Image
#eternal_व्हॅलेंटाईन_भाग_१ #platonic_love #मराठी_प्रेमगीत #रसग्रहण (लाईक नाही केलं तरी चालेल, पण शेवटपर्यंत वाचा)  वेगवेगळया hypothesis चा आधार घेऊन इतकं खात्रीशीर सांगता येईल, की आपली पृथ्वी, सूर्य आणि इतर ग्रहांची उत्पत्ती एकाच स्त्रोतापासून झाली आहे. ४.५ बिलियन वर्षांपूर्वी सूर्यापासून वेगळी होऊन पृथ्वी आकारास आली. त्यानंतर तिचा उपग्रह चंद्र आणि इतर ग्रह अस्तित्वास आले. सूर्य, बुध (Mercury), शुक्र( Venus), पृथ्वी आणि तिचा उपग्रह चंद्र ( Earth &Moon), मंगळ( Mars), गुरु (Jupiter), शनी (Saturn), युरेनस ,नेपच्यून अशा क्रमाने आपली सूर्यमाला आकारास आली. आपली पृथ्वी साडेतेवीस अंशात सूर्याच्या बाजूने कललेली असून ती एकाच वेळी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते. सूर्य आणि पृथ्वी हे पूर्वी एकच असल्यामुळे पृथ्वी सुरुवातीला प्रचंड उष्ण होती, नंतरच्या काळात तिचं वातावरण मानवांना राहण्यायोग्य झालं. तरी अजूनही तिचं अंतरंग प्रचंड उष्ण आणि अस्थिर आहे, हे ज्वालामुखी, भूकंप या घटनांतून स्पष्ट होतं. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो,आणि त्याचा प्रकाश म्हणजे त्याच्या पृष्ठभागावरुन प्रवर्तित होणारी सुर्यकिरणं...

गारंबीचा बापू आणि गारंबीची राधा भाग २

Image
#पुस्तकांच्या_पानांवरून २०२१: पर्ण दुसरे गारंबीची राधा ...एका कादंबरीतील पात्र दुसऱ्या कादंबरीत मुख्य पात्र होऊन कथासूत्र पुढे घेऊन जातं, अशा प्रकारचं लिखाण मराठीत फारच दुर्मिळ आहे. English literature मधे Tom Sawyer आणि Huckleberry Finn हे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे. तशाही अर्थाने ही कादंबरी मला वेगळी वाटते. गारंबीचा बापू या कथेचं continuation म्हणून जरूर वाचावी, अशी ही कादंबरी आयुष्याकडे पाहण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनासाठी वाचावी अशी आहे... (मागच्या भागात गारंबीचा बापू या कादंबरीचा अल्पसा परिचय करुन घेतल्यावर हा भाग गारंबीच्या राधाला समर्पित...) श्रीनांनी प्रस्तावनेत या राधाबद्दल बरंच काही सांगितलं आहे. बापू बरोबरच राधाची गोष्टही त्यांना सुचली होती. पुढे बापू खरोखरीच अफाट लोकप्रिय झाला, इतका की खुद्द पेंडसेना त्याचं हे यश पाहून अचंबा वाटत होता. अशा पार्श्वभूमीवर राधा लिहायला घेणं, हे शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. एक तर बापूची हवा इतकी, की त्याला दुय्यम स्थान दिल्यावर वाचकांची प्रतिक्रिया काय असेल याबद्दल निश्चित काही सांगता येत नव्हते, आणि दुसरं म्हणजे राधाची प्रतिमाही तशीच ठेवायची शिकस्त...

गारंबीचा बापू आणि गारंबीची राधा (भाग १)

Image
#पुस्तकांच्या_पानांवरून २०२१: पर्ण पहिले पुस्तकं निर्जीव नसतात. उलट ती चांगलीच सजीव, रसरशीत असतात. फक्त त्यांचं हे मर्म जाणून त्यांच्याकडे पाहणारा वाचक असावा लागतो. मग वाचन हीसुद्धा एक निर्जीव, शब्द वाचण्याची प्रक्रिया राहत नाही. तो एक संवाद होऊन जातो. लायब्ररीतली पुस्तकं मला खाणाखुणा करतात, असा माझा तरी अनुभव आहे. लायब्ररीत गेले की माझी नजर मोजक्या सात आठ पुस्तकांवर जातेच. त्यात पहिलं म्हणजे गीतारहस्य, पण ते वाचण्याइतकी माझी अजून तयारी नाही. तुकाराम गाथा,स्वामी, मैत्रेयी, मोगरा फुलला, मर्मभेद आणि बरीच मनात घर केलेली पुस्तकं पाहिली, की मला आवडते नातेवाईक भेटल्यावर वाटतं तसं होतं. गेले काही दिवस एक बाई मला अशा खाणाखुणा करत होत्या. दर वेळी समोरचा शेल्फ उघडला की गारंबीची राधा समोर दिसायची. एका बैठकीवर बसलेली सालंकृत लेकुरवाळी बाई असं मुखपृष्ठावर चित्र आहे. गारंबीचा बापू माहीत नाही, असा मराठी वाचक मिळणं दुर्मिळ आहे. अगदी वाचून माहीत नसला तरी ऐकून, कुणाला तरी घाणेकरांचा पिक्चर पाहून गारंबीचा बापू ओळखीचा झालेला असतोच. मलाही ती ओळख काही वर्षांपूर्वी झालेली होतीच. म्हणजे गोष्ट नक्की आठवत होती...

Reading_Audit_2020

#पुस्तकांच्या_पानांवरून  #Reading_Audit_2020 ∆ लघुकथा १)रत्नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा भाग २- संपादक गणेश मतकरी २) मेख मोगरी- रणजीत देसाई ३) गंधाली- रणजीत देसाई २)पाणपोई- वपु ३)आपण सारे अर्जुन- वपु ४)घर हरवलेली माणसं- वपु ५)झोपाळा- वपु ६) ऐक सखे- वपु ७) 100 World’s Greatest Short Stories: Collectable Edition ८) Dubliners- James Joyce ९)The Happy Prince and Other Tales- Oscar Wilde १०) The Elephant Vanishes - Murakami ११) Old Greek Stories- James Baldwin १२) The Lady With the Dog and Other Stories- Anton Chekhov १३) The daughter from a wishing tree - sudha Murthy १४) मंदाकिनी- वि. स. खांडेकर १५) काजळमाया- जी ए कुलकर्णी ∆ रहस्य कथा १) विश्वस्त- वसंत वसंत लिमये २) मर्मभेद- शशी भागवत ३) रत्नप्रतिमा- शशी भागवत ∆ कादंबरी १)अभोगी- रणजित देसाई २)पावनखिंड- रणजित देसाई ३) गुलाम- अतुल कहाते ४)झेप- ना सं इनामदार ५)मैत्रेयी- अरुणा ढेरे ६)आवरण- एस. एल. भैरप्पा ७)मंद्र- एस.एल. भैरप्पा ८)वंशवृक्ष- एस. एल. भैरप्पा ९)सिंहासन- अरुण साधू १०) सत्तर दिवस- रविंद्र गुर्जर ११) जीवनवेध- प्राचार्य शिवाजीर...

रत्नप्रतिमा: शशी भागवत

Image
"इतिहासपुरुष पृथ्वीवरील जल- स्थळाला व्यापून सुंदरपणे पसरला आहे. ढोसल्या- टोचल्यावाचून त्या निद्रिस्थ महापुरुषाच्या मुखातून साधा हुंकारही बाहेर पडत नाही. घडत्या घटना आणि अनंतकाळ उदरस्थ करीत हा क्षुधेने झपाटलेला दैत्य असाच रवंथ करीत शतकानुशतके पडून राहिला आहे, राहणार आहे.  अशाच कधी काळी काळाने लवंडल्या- सांडलेल्या आणि इतिहासाने शोधून घेऊन उदरस्थ केलेल्या व्यक्तींची, त्यांच्या भोवतीच्या घडलेल्या अद्भुत, रहस्यमय आणि रोमांचकारी घटनांची ही कथा सत्यासत्याचा कस लावण्याचा उपद्व्याप कोणी करु पाहील, त्या इतिहासपुरुषाला ओरबाडून जागे करू पाहील, तर त्याचीच नखे रक्तबंबाळ झाल्यावाचून राहणार नाहीत. कारण सत्याचा एक कणही इतिहासाने लेखकाला दिला नाही. कल्पनेच्या तीक्ष्ण नखांनी इतिहासपुरुषाच्या कुशीत गुदगुल्या केल्यावर तो विराट पुरुष क्षणभरच गदगदून हसला आणि त्यातून साकार झाली ही विलक्षण ' रत्न- प्रतिमा ! '..."   अशी भारदस्त सुरूवात आपल्याला एका अनोळखी गूढ वातावरणात सहज घेऊन जाते.नात्यांची विलक्षण गुंतागुंत, ताणलेले -दुरावलेले नातेसंबंध, विलक्षण साहस, राज्यांतर्गत कुरबुरी, कट का...

गोल्डा: एक अशांत वादळ. (लेखिका: वीणा गवाणकर)

Image
#पुस्तकांच्या_पानांवरून "...घड्याळाचा काटा चारवर आला. बेन गुरियाॅन यांनी हातातला लाकडी हातोडा टेबलावर आपटला. खाली बसायला जागा नसल्याने वरच्या मजल्यावर सज्ज असणाऱ्या फिलहार्मोनिक वाद्यवृंदाला तो इशारा नव्या राष्ट्रगीताला सुरुवात करण्याचा होता, हे समजलंच नाही. उपस्थित लोकांनी मात्र कशाचीही वाट न बघता राष्ट्रगीत हाटिक्वा म्हणायला सुरुवात केली. राष्ट्रगीत होताच बेन गुरियाॅन यांनी राष्ट्र स्थापनेची घोषणा केली. ' Medinat Yisrael' इस्रायल देश. सर्वांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते... बेन गुरियाॅन यांचं घोषणापत्र वाचून झाल्यावर त्यावर स्वाक्षरी करणारे एक एक सही करत गेले... अमेरिकेत असताना तिने शाळेत अमेरिकन स्वातंत्र्याच्या घोषणापत्रावर सह्या करणाऱ्यांच्या कहाण्या वाचल्या होत्या. असा अभूतपूर्व क्षण आपल्या आयुष्यात उगवेल अशी कल्पना तिने कधी केली नव्हती. ती घटना सत्यात अवतरली होती..." १४ मे १९४८, एका वस्तुसंग्रहालयाच्या दालनात, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत, ज्यूंच्या स्वतःच्या हक्काच्या देशाच्या स्थापनेची घोषणा झाली, तो दिवस. आणि या देशाच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर ज्...

महाकवी श्री कालिदासाचे मेघदूत: मराठी अनुवाद शांता ज. शेळके

Image
#मेघदूत #मराठी_मेघदूत #कविकुलगुरू_कालिदास #शांता_शेळके #rediscovering_the_Classics (पोस्ट थोडी मोठी असणार आहे,  वेळ काढून मन लावून वाचा!) महाकवी श्री कालिदासाचे मेघदूत :  मराठी अनुवाद शांता ज. शेळके - अभिजात संस्कृत साहित्याला मराठीची अजरामर मानवंदना!  "That praises are without reason lavished on the dead, and that the honours due only to excellence are paid to antiquity, is a complaint likely to be always continued by those, who, being able to add nothing to truth, hope for eminence from the heresies of paradox; or those, who, being forced by disappointment upon consolatory expedients, are willing to hope from posterity what the present age refuses, and flatter themselves that the regard which is yet denied by envy, will be at last bestowed by time..." Preface to Shakespeare या आपल्या टीकात्मक निबंधात डॉ. सॅम्युएल जॉन्सन यांनी सुरुवातीलाच ," हॅ , काय ते जुनं पुराणं outdated साहित्य वाचता?" , या कुत्सित शेऱ्याला दिलेलं हे सणसणीत प्रतिउत्तर आहे. शेक्सपिअरच्या साहित्य...