Posts

Showing posts from 2021

बोर्डरुम आणि नादवेध

Image
आजचा जमाना स्टार्टअपचा आहे. प्रत्येक जण आपली नवी कल्पना घेऊन बाजारात उतरु पाहतो आहे. एखादी संस्था अगर कंपनी कशी सुरु होते, वेगवेगळे चढउतार पार करत कशी नावारुपाला येते, याची आपल्याला कायमच उत्सुकता असते. जगभरात हजारो लाखोंनी सुरु होणाऱ्या उद्योगांत फक्त काहीच टिकतात, काही वाढतात, काही जगभरात आपलं नाव "brand value" निर्माण करतात. हे शक्य होण्यामागे कारण ठरते ती त्या त्या कंपनीची ध्येयधोरणं अमलात आणणारी Management अर्थात व्यवस्थापन! आजच्या काळात सेल्फ मॅनेजमेंट, ऑपरेशन मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट सारख्या सर्रास वापरल्या जाणाऱ्या संकल्पनांची थियरी सांगणारे " मॅनेजमेंट गुरु" शेकड्याने आहेत, पण ससंदर्भ स्पष्टीकरण देणारे विरळच! हा प्रश्न अच्युत गोडबोलेंनी या पुस्तकात सोडवला आहे. त्यांचा स्वतःचा या क्षेत्रातला अनुभव,  या विषयासंबंधी त्यांनी केलेलं चौफेर वाचन याच्या आधारे त्यांनी या पुस्तकात व्यवस्थापन या विषयाचा/ शास्त्राचा इतिहास यासह जगभरात नावाजलेल्या कंपन्या, त्यांची मॅनेजमेंट याबद्दल मुद्देसूद माहिती पुरवली आहे. आर्य चाणक्य- निकोलो मॅकियावेली- ॲडम स्मिथ- रॉबर्ट ओव...

प्रेमातून प्रेमाकडे आणि समांतर जीवन

Image
स्त्री-पुरुष नात्याविषयी आजवर वेगवेगळया साहित्यात वेगळ्या ढंगाने लिहिलं गेलेलं बरच काही आजवर वाचलं आहे. यावेळी या विषयावर काही छानसं वाचायला मिळालं याचं समाधान आहे.. मुळात हा एक नाजूक विषय, पण तो तितक्याच प्रेमाने हाताळू शकणाऱ्या एक लेखिका म्हणजे माझ्यासाठी तरी, अरुणा ढेरे ! त्यांच्या कविता, कृष्णकिनारा, मैत्रेयी, विस्मृतीचित्रे हे जे जे काही वाचलं, त्यात प्रकर्षाने जाणवते ती या नात्याविषयी असलेली समज आणि त्याविषयीची अकृत्रिम संवेदना! स्त्री पुरुष संबंधात काही नात्यांना नाव असतं, एक ओळख असते. पण काही नाती या बंधनाच्या पलीकडची असतात. 'नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही' ही कुसुमाग्रजांची कविता माझी विशेष लाडकी कविता, पण असं नाव नसलेलं नातं निर्माण होणं, त्या नात्याची गरिमा जपणं, आपल्या आणि इतरांच्या नजरेतही ते नातं तितकंच निष्पाप ठेवणं आणि शेवटपर्यंत निभावून नेणं, ही खरी कसरत आहे. ज्याच्या अगर जिच्या वाट्याला असं नातं आलं, ती व्यक्ती खरंच भाग्यवान! इतर कुठल्या नात्यात नसली, तर ती माणसं प्रेमात असतील, असं नाव द्यायला आणि नावं ठेवायला समाज हात- ज...

भारतीय मातृकथा ( खंड १,२,३,४)

Image
नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गति: नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया || महाभारतातल्या शांतीपर्वात गौतम ऋषींचे पुत्र चिरकारी यांनी मातेचे गुणवर्णन करताना उद्धृत केलेला हा श्लोक म्हणजे आपल्या संस्कृतीत स्त्रीच्या प्रत्येक रुपाला दिलेली एक मानवंदना आहे. भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक धार्मिक पंथात स्त्रीला कायमच बरोबरीचा दर्जा देऊन तिच्या योगदानाची दखल घेतलेली दिसते. एक कन्या, भगिनी, पत्नी, माता, गृहस्वामिनी या पारंपरिक भूमिका बजावणाऱ्या स्त्रियांबरोबरच एक तपस्विनी,भक्त, विदुषी, वीरांगना, राज्ञी,नागरिक, समाजसेवक, सुधारक अशा अनेक भूमिकांत वावरत आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या स्त्रियांच्या अगणित कथा आपण आजवर ऐकल्या आहेत. लक्ष्मी- पार्वती- सरस्वती, पंचसती, महाकाव्यांतल्या अगणित स्त्रिया, ऋषीपत्नींच्या गोष्टी हा एका प्रकारे मूल्यसंस्कारच आहे. अशा अनेक मातांच्या गोष्टींचा हा संग्रह- भारतीय मातृकथा.  कृष्णराव पंढरीनाथ देशपांडे आणि सुलभा देशपांडे लिखीत चार खंडांत विभागलेला हा स्त्रीशक्तीला समर्पित असलेला कथासंग्रह वेद-उपनिषद काळापासून ते आजपर्यंतच्या काळाला गवसणी घालत...

लीळा पुस्तकांच्या

Image
#पुस्तकांच्या_पानांवरुन वर्ष २०२१: पर्ण अकरावे लीळा पुस्तकांच्या : नितीन रिंढे वाचनवेडाचा सोहळा साजरा करणारं पुस्तक " पुस्तकाचा शोध चाकाच्या शोधासारखा मानवजातीच्या इतिहासातल्या ' मूलभूत शोधां' पैकी आहे. अशा शोधात पुढे बदतल्या काळानुसार फेरफार होत राहिले तरी त्यातली मूळ संकल्पना कायम राहते."  पुस्तक वाचून होताना मलपृष्ठावर उद्धृत केलेलं उम्बर्तो इकोचं हे वाक्य वाचल्यावर एक वाचक म्हणून जाणवतं, ते पुस्तकांकडे बघण्याचा एक नवाच आणि हटके दृष्टिकोन मिळाल्याचं समाधान. कथा, कादंबरी, चरित्रे, कविता, वैचारिक असं अनेक प्रकारचं लिखाण म्हणजे पुस्तक अशीच सरळसाधी कल्पना डोक्यात असणारे आपण पुस्तक एक 'वस्तू' म्हणून फार कमी वेळा विचारात घेतो. या विषयावर केलेलं लिखाण, म्हणजे पुस्तक एक वस्तू म्हणून विचारात घेऊन केलेलं लिखाण म्हणजे पुस्तकावरील पुस्तक. या विषयावर काय लिखाण होऊ शकतं, तर पुस्तकं जमावण्याच्या- गमावण्याच्या आठवणी, पुस्तक केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली चरित्रे, पुस्तकाभोवती आशय गुंफलेल्या कादंबऱ्या, पुस्तकांचे इतिहास; मुद्रण- बांधणी- मांडणी - संग्रह- वितरण याविषयी कल्पना आण...

आषाढस्य प्रथमदिने: भाग २

Image
मागच्या भागात अभिजात साहित्याचे निकष, उदाहरणं, कालिदास- काळ, दंतकथा, साहित्य, मेघदूताचं स्वरुप, आषाढस्य प्रथमदिने बद्दल जाणून घेतल्यावर आता मराठीतल्या मेघदूतविषयी काही खास असं... मराठीत या अजरामर काव्याचा अनुवाद करताना सिद्धहस्त कवियत्री शांता शेळके यांनी प्रस्तावनेत त्यांचं शालेय- महाविद्यालयीन अवस्थेपासून सदाजागृत असलेलं मेघदूत प्रेम प्रकट केलं आहे. त्या म्हणतात," माझा अनुवाद सरळ, साधा, ' पादाकुलका' सारख्या प्रवाही छंदात केलेला आहे. तो करताना मुळातील आशयाला, रसवत्तेला हानी पोहोचू नये, याची मी शक्य तेवढी काळजी घेतली आहे. मुख्य म्हणजे, माझ्या पदरचे त्यात काहीही, कुठेही घालण्याचे धार्ष्ट्य मी केले नाही. ' मेघदूता'चे दर्शन न घेतलेल्या वाचकांना या अनुवादामुळे मुळच्या संस्कृत काव्याचे वाचन करण्याची उत्सुकता निर्माण व्हावी, एवढीच माझी नम्र अपेक्षा आहे. तसे झाले, तर मला अतिशय आनंद होईल."  पूर्वीच सांगितल्याप्रमाणे, मूळचं काव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ असं दोन भागांत विभागलेलं आहे. पूर्वमेघाची सुरुवातच,    कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्त:  शापेन...

आषाढस्य प्रथमदिने: भाग १

Image
#पुस्तकांच्या_पानांवरुन वर्ष २०२१: पर्ण दहावे अभिजात साहित्य, कालिदासांची स्वतःची जीवनकहाणी, अजरामर रचना आणि आषाढस्य प्रथमदिनेची खरी कहाणी, आणि बरंच काही... (पोस्ट थोडी मोठी असणार आहे, वेळ काढून मन लावून वाचा!) "That praises are without reason lavished on the dead, and that the honours due only to excellence are paid to antiquity, is a complaint likely to be always continued by those, who, being able to add nothing to truth, hope for eminence from the heresies of paradox; or those, who, being forced by disappointment upon consolatory expedients, are willing to hope from posterity what the present age refuses, and flatter themselves that the regard which is yet denied by envy, will be at last bestowed by time..." Preface to Shakespeare या आपल्या टीकात्मक निबंधात डॉ. सॅम्युएल जॉन्सन यांनी सुरुवातीलाच ," हॅ , काय ते जुनं पुराणं outdated साहित्य वाचता?" , या कुत्सित शेऱ्याला दिलेलं हे सणसणीत प्रतिउत्तर आहे. शेक्सपिअरच्या साहित्याइतकीच अजरामर अशी त्याच्या साहित्याची प्र...

Body Language

Image
#पुस्तकांच्या_पानांवरून  वर्ष २०२१: पर्ण नववे * Body_Language* Actions speak louder than words!   This old age proverb contains an important life lesson for everyone. Well, I am not interested in philosophical part, but just take the same proverb literally, it still makes sense! We communicate not only through words, but also through physical behaviour, expressions, mannerisms i.e. our body language. I find this topic always very fascinating and engrossing, how our body actually radiates a whole bunch of signals to others. (Any reading suggestions related to this topic are always welcome!) That's why I decided to give this book a try, and I am totally satisfied!      Body Language - 'How to Read Others' Thoughts By Their Gestures ' is a best-selling book by Allan Pease . In this book, author has covered almost all types of gestures i.e. hand, leg, arm, palm, hand-to-face, eye signals and lot more.Let me just list down four features, why this book makes sense to...

जेरुसलेम

Image
पुस्तकांच्या_पानांवरून वर्ष २०२१: पर्ण आठवे गेल्या आठवड्यात मध्यपूर्व आशियाशी संबंधित दोन पुस्तकं वाचली. पहिलं पुस्तक आहे सायमन सीबग मांटफिऑरी यांनी लिहिलेलं आणि सविता दामले यांनी मराठीत अनुवादित केलेलं ' जेरुसलेम: एक चरित्रकथा' . सध्या कायम विवादात असलेलं जेरुसलेम म्हणजे ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम अशा तीनही धर्मांमधे एक पवित्र शहर, एक धर्मक्षेत्र म्हणून मान्यता पावलेलं आहे. ज्यू लोकांचं मूळ स्थान(Promised Land), तसेच ज्यू धर्मातलं सर्वोच्च पवित्र मानलं गेलेलं मुख्य धर्मस्थळ होली टेम्पल, जिथून जगाच्या रचनेचा पाया रचला गेला, जे देवाचं निवासस्थान आहे, Holy of Holies अशा मंदिराचं मूळ स्थान असलेली पश्चिम भिंत ( Western Wall) जेरुसलेम इथे आहे. राजा डेव्हिड (ख्रि.पू. १०१०-९७०) याने हे शहर जिंकून त्याला ज्यू साम्राज्याची राजधानी बनवलं. तर त्याचा मुलगा राजा सोलोमनने इथे ज्यू धर्माचं पहिलं तर राजा हेरड याने दुसरं Holy Temple बांधलं , असा इतिहास आहे. इस्लाम धर्मानुसार, प्रेषित मुहम्मद पैगंबरांनी मक्केहून रात्रीचा प्रवास करून इथे येऊन ज्या जागी प्रार्थना केली, ती जागा(Blessed Land of Qu...

गानयोगी: पं. द. वि. पलुस्कर

Image
#पुस्तकांच्या_पानांवरून  २०२१:पर्ण सातवे गानयोगी :पं. द. वि. पलुस्कर कट्यार काळजात घुसली नाटक पहिल्यांदा टीव्हीवर पहिलं, तेव्हापासून अभिजात संगीताची वेगवेगळी घराणी, त्यांची शैली याविषयी मला आकर्षण आहे. पुढे Bandish Bandits आणि Darbarfestival चॅनेलवरचे व्हिडिओ पहिल्यापासून या आकर्षणात अजूनच भर पडली. पूर्वी मोठमोठ्या राजे रजवाड्यांच्या,संस्थानिकांच्या पदरी अनेक गुणी कलावंत असत. राजाश्रय मिळत असल्यामुळे इतर भौतिक गोष्टींची चिंता न करता ते सूरसाधना करू शकत. मग हे राजमहालातलं गाणं लोकाभिमुख कसं झालं, कुणी केलं, अनेक पिढ्यांच्या योगदानामुळे ही घराणी कशी निर्माण होत गेली, राजाश्रय ते लोकाश्रय हा विलक्षण प्रवास कसा काय घडला ही माहिती मला हवी होती. आणि माझ्या सुदैवाने माझ्या असंख्य प्रश्नांचं उत्तर मला दिलं ते अंजली कीर्तने लिखीत गानयोगी: पं. द. वि. पलुस्कर या पुस्तकाने!  'जब जानकीनाथ सहाय करे तब' याचे गायक यापलीकडे मला बापूराव यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. पण आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तृत्व वाचल्यापासून अंजली कीर्तने यांच्या लिखाणाबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण झाल...

एम टी आयवा मारू: अनंत सामंत

Image
#पुस्तकांच्या_पानांवरून २०२१: पर्ण सहावे # एम_टी_आयवा_मारू : समुद्राच्या लहरीवर चाललेल्या मानवी आयुष्याचा थरार!  नावात काय आहे या उक्तीला खोटं ठरवणारी कादंबरी असंच या कादंबरीचं वर्णन मी सुरूवातीला करेन. मी कधीच आपणहून ज्या विषयावरचं लिखाण वाचलं नसतं, ते या चमत्कारिक नावामुळे या कादंबरीकडे आकर्षित होऊन वाचलं. लॉर्ड जीम, हार्ट ऑफ डार्कनेस, मॉबी डिक, ओल्ड मॅन अँड द सी, रायडर्स टू द सी अशा समुद्र आणि माणसांच्या आंतरसंघर्षाचं चित्र रेखाटणाऱ्या अतिशय लोकप्रिय कादंबऱ्या, नाटकांच्या पंक्तीत शोभून दिसेल अशी ही कादंबरी आहे. एम टी आयवा मारू या काहीशा चमत्कारिक नावाचा अर्थ तसा हटकेच आहे. एम टी म्हणजे मोटर टँकर, मारू म्हणजे जहाज पण एम टी आयवा मारू या जपानी शब्दांचा एकत्रित अर्थ प्रेम आणि एकरूपता यांच्या भावूक चेतनेचे जहाज!  सुरुवातीलाच नावाइतकीच मनात घर करून गेली, ती या कादंबरीची अर्पणपत्रिका आणि प्रस्तावना. या दोन्हींतून खलाशांच्या संघर्षाला, समुद्राला जी काही भावोत्कट मानवंदना दिली आहे, त्याला खरंच तोड नाही ! मी आजवर वाचलेली सगळ्यात सुंदर अर्पणपत्रिका आणि प्रस्तावना आयवा मार...

गीतरामायण

Image
#पुस्तकांच्या_पानांवरुन  २०२१: पर्ण पाचवे अजाणतेपणी केंव्हा माता घाली बाळगुटी बीज धर्माच्या द्रुमाचे कण कण गेले पोटी छंद जाणतेपणीचा, तीर्थे काव्याची धुंडिली कुण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली... गीतरामायणाचे सूर घुमले नाहीत, असं एकही मराठी घर नसेल. गीतरामायण म्हणजे शुभंकर संस्कारांचं पाथेय ! महासागरासारखी व्याप्ती असणारी रामकथा केवळ ५६ गीतांच्या माध्यमातून शब्दबद्ध करणाऱ्या गदिमा तथा गजानन दिगंबर माडगूळकर आणि त्या गीतांना आपल्या श्रवणीय सुरांचे अलंकार चढवणाऱ्या बाबूजी तथा सुधीर फडके यांचे मराठी रसिकांवर अनंत उपकार आहेत. १९५५ साली पुणे आकाशवाणीचे सीताकांत लाड यांना धार्मिक किंवा नैतिक थीमवर आधारित लोकांना आवडेल, असा एखादा कार्यक्रम करायचा होता. त्यासाठी त्यांनी गदिमांना विचारणा केली. (म्हणजे तसं बघायला गेलं तर खरंच गदिमांनी गीत रामायण लिहावं ही रामाचीच इच्छा होती म्हणायची!) दोघांनी मिळून रामायणावर आधारित कार्यक्रम करायचा असं ठरवलं. गदिमा गीतं लिहितील, आणि बाबूजी संगीत दिग्दर्शन करतील आणि दर शुक्रवारी एक एक गाणं आकाशवाणीवर प्रसारित केलं जाईल हे ठरलं. आणि १ एप्रिल १९५५ साली 'स्वय...

द्रोहपर्व : अजेय झणकर

Image
#पुस्तकांच्या_पानांवरून २०२१: पर्ण चौथे #पुस्तक_परीक्षण #ऐतिहासिक_कादंबरी "... काका... वाड्यात पाहा हो कशी धूम करुन मारामारी करतात. म्हणून आलो. तुम्हीच हा फितूर केला ना काका... तुम्हीच हा फितूर केला. तुम्हांस काय पाहिजे ते देतो पण हे गारदी समजावून वाटेस लावा. राज्य घ्या हवं तर. मला कैदेत घालून सुखानं राज्य करा पण त्यांना आवरा...ते पहा ते आले. त्यांना आवरा. काकाऽ ऽ मला वाचवा. मला वाचवा काकाऽऽऽ मला वाचवा... मधे पडून चापाजी टिळेकर, नारोबा फाटक यांनी आपला जीव गमावून आपल्या धन्याला वाचवायचा प्रयत्न केला पण... काही क्षणांत महंमद युसुफ, सुमेरसिंह आणि तुळाजीचे वारावर वार पडले. दोन...चार... छेऽऽऽ नारायणरावांच्या देहाचे जवळजवळ आठ- दहा तुकडे इकडे तिकडे विखुरले होते..." मराठी वाचकांना नारायणराव पेशवे माहीत आहेत, ते केवळ "काका मला वाचवा" आणि आनंदीबाईंनी त्यांच्यासाठी लिहिलेल्या पत्रात "ध चा मा केला" एवढ्याचसाठी. हे नाट्य माहीत असलं तरी प्रत्यक्षात तेव्हा काय घडत होतं, आणि मुख्य म्हणजे पेशव्यांचा अशा प्रकारे खून झाल्यावर त्याने राजकारणाला कशी वेगळीच कलाटणी मिळाली, याचा ...

रहस्यभेद पूर्वार्ध आणि उत्तरार्ध ( लेखक गो. ना.दातारशास्त्री)

Image
#पुस्तकांच्या पानांवरुन २०२१: पर्ण तिसरे #रहस्यकथा # रहस्यभेद विविध साहित्य प्रकारातले लघुकथा आणि रहस्य कथा हे दोन प्रकार मला अधिक लक्षवेधी वाटतात. उत्स्फूर्तपणे सुचणारं काहीतरी ' a piece of life' या चौकटीत बसवून शब्दांची मर्यादा सांभाळत एक सुसंबद्ध गोष्ट निर्माण करणं यातून लघुकथेचा आविष्कार होतो. आणि रहस्यकथा लिहिणे म्हणजे कोळी ज्याप्रमाणे एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदुपर्यंत आपलं जाळं विणत जातो, तशा प्रकारे एक कल्पना, एक रहस्य विस्तारत नेणं. किचकट जाळं विणताना कोळी त्या जाळ्यात स्वतः अडकत नाही, तसंच रहस्यकथा लिहिताना लेखकाला प्रत्येक बारकाव्याबद्दल अखंड दक्ष राहावं लागतं. जिगसॉ पझलमधे जसं शेवटचा तुकडा त्याच्या जागेवर बसल्याशिवाय चित्र पूर्ण होत नाही, तसं एक एक बारकावा कथासूत्रात नीट गुंफल्याशिवाय रहस्यकथा परिपूर्ण होत नाही.  यावेळी वाचलेली रहस्यकथा आहे गोविंद नारायण दातार शास्त्री यांनी लिहिलेली रहस्यभेद ही दोन भागांत विभागलेली कादंबरी . विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठी वाचकांत दातार शास्त्री हे नाव शालिवाहन शक, इंद्रभुवनगुहा, विलासमंदिर, विश्वनाथ,कालिकामूर्ती, प्रवाळद्वीप,...

पृथ्वीचे प्रेमगीत ( कुसुमाग्रज)

Image
#eternal_व्हॅलेंटाईन_भाग_१ #platonic_love #मराठी_प्रेमगीत #रसग्रहण (लाईक नाही केलं तरी चालेल, पण शेवटपर्यंत वाचा)  वेगवेगळया hypothesis चा आधार घेऊन इतकं खात्रीशीर सांगता येईल, की आपली पृथ्वी, सूर्य आणि इतर ग्रहांची उत्पत्ती एकाच स्त्रोतापासून झाली आहे. ४.५ बिलियन वर्षांपूर्वी सूर्यापासून वेगळी होऊन पृथ्वी आकारास आली. त्यानंतर तिचा उपग्रह चंद्र आणि इतर ग्रह अस्तित्वास आले. सूर्य, बुध (Mercury), शुक्र( Venus), पृथ्वी आणि तिचा उपग्रह चंद्र ( Earth &Moon), मंगळ( Mars), गुरु (Jupiter), शनी (Saturn), युरेनस ,नेपच्यून अशा क्रमाने आपली सूर्यमाला आकारास आली. आपली पृथ्वी साडेतेवीस अंशात सूर्याच्या बाजूने कललेली असून ती एकाच वेळी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते. सूर्य आणि पृथ्वी हे पूर्वी एकच असल्यामुळे पृथ्वी सुरुवातीला प्रचंड उष्ण होती, नंतरच्या काळात तिचं वातावरण मानवांना राहण्यायोग्य झालं. तरी अजूनही तिचं अंतरंग प्रचंड उष्ण आणि अस्थिर आहे, हे ज्वालामुखी, भूकंप या घटनांतून स्पष्ट होतं. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो,आणि त्याचा प्रकाश म्हणजे त्याच्या पृष्ठभागावरुन प्रवर्तित होणारी सुर्यकिरणं...

गारंबीचा बापू आणि गारंबीची राधा भाग २

Image
#पुस्तकांच्या_पानांवरून २०२१: पर्ण दुसरे गारंबीची राधा ...एका कादंबरीतील पात्र दुसऱ्या कादंबरीत मुख्य पात्र होऊन कथासूत्र पुढे घेऊन जातं, अशा प्रकारचं लिखाण मराठीत फारच दुर्मिळ आहे. English literature मधे Tom Sawyer आणि Huckleberry Finn हे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे. तशाही अर्थाने ही कादंबरी मला वेगळी वाटते. गारंबीचा बापू या कथेचं continuation म्हणून जरूर वाचावी, अशी ही कादंबरी आयुष्याकडे पाहण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनासाठी वाचावी अशी आहे... (मागच्या भागात गारंबीचा बापू या कादंबरीचा अल्पसा परिचय करुन घेतल्यावर हा भाग गारंबीच्या राधाला समर्पित...) श्रीनांनी प्रस्तावनेत या राधाबद्दल बरंच काही सांगितलं आहे. बापू बरोबरच राधाची गोष्टही त्यांना सुचली होती. पुढे बापू खरोखरीच अफाट लोकप्रिय झाला, इतका की खुद्द पेंडसेना त्याचं हे यश पाहून अचंबा वाटत होता. अशा पार्श्वभूमीवर राधा लिहायला घेणं, हे शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. एक तर बापूची हवा इतकी, की त्याला दुय्यम स्थान दिल्यावर वाचकांची प्रतिक्रिया काय असेल याबद्दल निश्चित काही सांगता येत नव्हते, आणि दुसरं म्हणजे राधाची प्रतिमाही तशीच ठेवायची शिकस्त...