Posts

Showing posts from 2020

रत्नप्रतिमा: शशी भागवत

Image
"इतिहासपुरुष पृथ्वीवरील जल- स्थळाला व्यापून सुंदरपणे पसरला आहे. ढोसल्या- टोचल्यावाचून त्या निद्रिस्थ महापुरुषाच्या मुखातून साधा हुंकारही बाहेर पडत नाही. घडत्या घटना आणि अनंतकाळ उदरस्थ करीत हा क्षुधेने झपाटलेला दैत्य असाच रवंथ करीत शतकानुशतके पडून राहिला आहे, राहणार आहे.  अशाच कधी काळी काळाने लवंडल्या- सांडलेल्या आणि इतिहासाने शोधून घेऊन उदरस्थ केलेल्या व्यक्तींची, त्यांच्या भोवतीच्या घडलेल्या अद्भुत, रहस्यमय आणि रोमांचकारी घटनांची ही कथा सत्यासत्याचा कस लावण्याचा उपद्व्याप कोणी करु पाहील, त्या इतिहासपुरुषाला ओरबाडून जागे करू पाहील, तर त्याचीच नखे रक्तबंबाळ झाल्यावाचून राहणार नाहीत. कारण सत्याचा एक कणही इतिहासाने लेखकाला दिला नाही. कल्पनेच्या तीक्ष्ण नखांनी इतिहासपुरुषाच्या कुशीत गुदगुल्या केल्यावर तो विराट पुरुष क्षणभरच गदगदून हसला आणि त्यातून साकार झाली ही विलक्षण ' रत्न- प्रतिमा ! '..."   अशी भारदस्त सुरूवात आपल्याला एका अनोळखी गूढ वातावरणात सहज घेऊन जाते.नात्यांची विलक्षण गुंतागुंत, ताणलेले -दुरावलेले नातेसंबंध, विलक्षण साहस, राज्यांतर्गत कुरबुरी, कट का...

गोल्डा: एक अशांत वादळ. (लेखिका: वीणा गवाणकर)

Image
#पुस्तकांच्या_पानांवरून "...घड्याळाचा काटा चारवर आला. बेन गुरियाॅन यांनी हातातला लाकडी हातोडा टेबलावर आपटला. खाली बसायला जागा नसल्याने वरच्या मजल्यावर सज्ज असणाऱ्या फिलहार्मोनिक वाद्यवृंदाला तो इशारा नव्या राष्ट्रगीताला सुरुवात करण्याचा होता, हे समजलंच नाही. उपस्थित लोकांनी मात्र कशाचीही वाट न बघता राष्ट्रगीत हाटिक्वा म्हणायला सुरुवात केली. राष्ट्रगीत होताच बेन गुरियाॅन यांनी राष्ट्र स्थापनेची घोषणा केली. ' Medinat Yisrael' इस्रायल देश. सर्वांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते... बेन गुरियाॅन यांचं घोषणापत्र वाचून झाल्यावर त्यावर स्वाक्षरी करणारे एक एक सही करत गेले... अमेरिकेत असताना तिने शाळेत अमेरिकन स्वातंत्र्याच्या घोषणापत्रावर सह्या करणाऱ्यांच्या कहाण्या वाचल्या होत्या. असा अभूतपूर्व क्षण आपल्या आयुष्यात उगवेल अशी कल्पना तिने कधी केली नव्हती. ती घटना सत्यात अवतरली होती..." १४ मे १९४८, एका वस्तुसंग्रहालयाच्या दालनात, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत, ज्यूंच्या स्वतःच्या हक्काच्या देशाच्या स्थापनेची घोषणा झाली, तो दिवस. आणि या देशाच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर ज्...

महाकवी श्री कालिदासाचे मेघदूत: मराठी अनुवाद शांता ज. शेळके

Image
#मेघदूत #मराठी_मेघदूत #कविकुलगुरू_कालिदास #शांता_शेळके #rediscovering_the_Classics (पोस्ट थोडी मोठी असणार आहे,  वेळ काढून मन लावून वाचा!) महाकवी श्री कालिदासाचे मेघदूत :  मराठी अनुवाद शांता ज. शेळके - अभिजात संस्कृत साहित्याला मराठीची अजरामर मानवंदना!  "That praises are without reason lavished on the dead, and that the honours due only to excellence are paid to antiquity, is a complaint likely to be always continued by those, who, being able to add nothing to truth, hope for eminence from the heresies of paradox; or those, who, being forced by disappointment upon consolatory expedients, are willing to hope from posterity what the present age refuses, and flatter themselves that the regard which is yet denied by envy, will be at last bestowed by time..." Preface to Shakespeare या आपल्या टीकात्मक निबंधात डॉ. सॅम्युएल जॉन्सन यांनी सुरुवातीलाच ," हॅ , काय ते जुनं पुराणं outdated साहित्य वाचता?" , या कुत्सित शेऱ्याला दिलेलं हे सणसणीत प्रतिउत्तर आहे. शेक्सपिअरच्या साहित्य...

शांताराम :एका इंग्रजी भाषिकाच्या मराठी नावाच्या इंग्रजी गोष्टीचा मराठी अनुवाद!

Image
शांताराम- एका इंग्रजी भाषिकाच्या मराठी नावाच्या इंग्रजी गोष्टीचा मराठी अनुवाद!) लेखक: ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स मराठी अनुवाद: अपर्णा वेलणकर #पुस्तकांच्या_पानांवरुन पुस्तक वाचताना आणि ते वाचून झाल्यावर येणारा अनुभव हा प्रत्येक वेळी वेगळाच असतो. काही वेळा ' झालं बुवा एकदाचं पुरं' ही भावना असते. काही वेळा 'इतक्यात का संपलं, अजून थोडं लिहिलं असतं तर काय बिघडलं असतं' अशी चुटपुट लागून राहते. कधीतरी आपण काहीशा अनिच्छेने एखादं भलंमोठं पुस्तक वाचायला घेतो, रटाळ निघालं तर लगेच वाचन बंद करायचं हे आधी ठरवून! पुढे तर ' माझी इच्छा आहे हे पुस्तक अर्ध्यात वाचून सोडायची, पण पुस्तकाची तयारी आहे का मला सोडायची?' अशी फिरकीही काही पुस्तकं घेत असतात. ती वाचून झाली की काहीवेळ स्थब्ध, स्तिमित व्हायला होतं. इतके दिवस ते पुस्तक पानागाणिक तुम्हाला वळणा वळणांनी हिंडव हिंडव हिंडवत असतं. आणि आता एकाएकी तो प्रवास संपून तुम्ही खऱ्या जगात आलेले असता.हा अनुभव देणारं हे पुस्तक... शांताराम!  ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स या ऑस्ट्रेलियातील मॅग्झिमम  सेक्युरिटी प्रिझन मधून फरार झालेल्या पूर्वाश्रमीच्या एक...

कुणा एकाची भ्रमणगाथा- वेदनेचा सन्मानसोहळा

Image
" ही खुशीची फकिरी फार अजब असते. लौकिकार्थाने घर संसाराला पारख्या असणाऱ्या अमीराची फकिरी, जमाखर्चाच्या वह्या वाचता येणाऱ्यांना नाही कळायची!" रावसाहेब हरीहरांबद्दल पुलं जे म्हणतात, तशाच माटाचं एका भन्नाट आयुष्य जगलेल्या अवलियाची, गोपाळ नीलकंठ दांडेकर अर्थात् गोनीदा यांची गोष्ट म्हणजे कुणा एकाची भ्रमणगाथा!  आजवर गोनीदांचं जे काही साहित्य वाचलं आहे, त्यावरून मला अगदी मनापासून जाणवलेल्या आणि भावलेल्या गोष्टी अनेक आहेत. पहिली म्हणजे त्यांच्या लिखाणातून सदोदित जाणवत राहणारी unmatched संवेदनशीलता. दुसरी म्हणजे निसर्गाची उत्कट ओढ, जी त्यांच्या प्रत्येक निसर्गवर्णनात प्रकर्षाने जाणवत राहते. किंबहूना गोनीदांच्या लेखनात निसर्ग आपसूक डोकावतच असतो. एरव्ही बाकीच्या लिखाणात आलेली निसर्गवर्णनं उगाच लांबड म्हणून गाळून आपण पुढे वाचू लागतो, पण गोनीदांच्या साहित्यात निसर्ग अगदी रसरशीत, जीवंत रुपात आपल्यासमोर येतो. आणि तिसरी म्हणजे 'स्व'च्या किंवा 'मी' पणाच्या सगळया चौकटी भेदून जायची अनावर ओढ. आजवर हे साहित्य वाचताना गोनीदांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला अजिबात काहीच मा...

जगाच्या पाठीवर (सुधीर फडके)

#पुस्तकांच्या_पानांवरून पुस्तक परिचय: जगाच्या पाठीवर लेखक: सुधीर फडके (आत्मचरित्र) प्रकाशक: राजहंस प्रकाशन स्वयें श्री राम प्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती|| दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा,  पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा||  लोक साक्ष शुद्धी झाली सती जानकीची, स्वामिनी निरंतर माझी सीता ही खरेचि||  या आणि अशा अनेक गाण्यांनी आपली सुरेल सोबत करणारे रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके अर्थात् आपले लाडके बाबूजी यांचं जगाच्या पाठीवर हे अपूर्ण आत्मचरित्र आत्ताच काही दिवसांपूर्वी वाचलं. मुळात हे काही पूर्ण आत्मचरित्र नाही, अर्ध देखील नाही. बाबूजींच्या जन्मापासून ते त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीच्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंतच्या आठवणी बाबूजींनी या चरित्रात शब्दांकित केल्या आहेत. यात त्यांनी आपलं बालपण, एकेकाळी वैभव पाहिलेल्या प्रतिथयश वकील असणाऱ्या वडिलांना सोसावे लागलेले दारिद्र्याचे चटके, आईचा अकाली मृत्यू, त्यानंतरची या भावंडांची हलाखीची परिस्थिती आणि त्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बालपणापासून ते तारुण्यापर्यंत निरंतर न चुकलेला संघर्ष असा घटनाक्रम या पु...

Atomic Habits

Image
Most of the people who know me, know me for my positivity and high spirit. They even ask me a reason or funda for being so cheerful all the time. Sincerely speaking, I don't consider myself to be a high spirited one. But when something new comes up, I am ready to take it and treat it as a challenge. & This feeling of being busy or engaged works like a charm for me, at least. But recently, I have been facing little low time. Because of Corona, we all are stuck at our homes. At first, there was a sense of relief and peace but gradually it turned into boredom. My routine became totally monotonous than ever. That is why, I decided to give a self help book a try.  Up until now, I have read many classics, peotry, short stories , dramas etc. But I never treated psychological or self help books as a serious literary genre. So initially I was totally hesitant to go ahead with this idea, mainly because of my lack of knowledge or reading experience. This confusion went on for many days an...

उपसंहार

Image
 # पुस्तकांच्या_पानांवरून #उपसंहार हैं कथा संग्राम की विश्व के कल्याण की... अ व्यक्ती: काय हो, तुम्हाला महाभारत म्हणजे काय ते ठाऊक आहे? ब व्यक्ती: हा काय प्रश्न आहे? हा आपला इतिहास आहे. अर्थातच मला ठाऊक आहे. अ व्यक्ती: तरी किती पुस्तकं वाचली असतील महाभारतावर? ब व्यक्ती: कथा कादंबऱ्या धरून किमान १० तरी अ व्यक्ती: मग महाभारत कधी इसवी सन पूर्व कोणत्या काळी लिहिलं गेलं? ब व्यक्ती: अंऽऽऽ , तसं नक्की नाही हो सांगता यायचं अ व्यक्ती: बरं मग भारती युद्ध नक्की कधी झालं? ब व्यक्ती: ते कशाला माहिती असायला हवं? अ व्यक्ती: बरं जाऊदे, ते अक्षौहिणी ही काय भानगड आहे?  ब व्यक्ती: मला तरी कुठे ठाऊक आहे? अ व्यक्ती: त्या काळचे लोक कसे राहायचे हो? त्यांचे कपडे, घरं कशी असायची? त्यांचे आदर्श काय होते? ब व्यक्ती: अहो, मला महाभारताची गोष्ट माहिती आहे हो! अ व्यक्ती: आणि महाभारताचा इतिहास? ब व्यक्ती: ऑ !  ( या संवादात आपली उत्तरं ब व्यक्तीसारखी नाहीत ना? याची खात्री सवडीने करून घ्या.) आज या घडीला आणि यापूर्वी होऊन गेलेल्या सीरियलस् मधे सर्वाधिक TRP मिळवणाऱ्या सीरियल कोणत्या आहेत, याचं उत्तर तुम्हाल...

मर्मभेद- शशी भागवत

Image
 #पुस्तकांच्या_पानांवरून पॉलिटीकल सस्पेन्स थ्रिलरच्या शाळेत बाहुबली जर दहावी शिकत असेल, तर आपली शोध कादंबरी त्याची गुरु आहे, आणि मर्मभेद तर त्या शाळेची ट्रस्टी आहे ट्रस्टी!  फार पूर्वी भारतात सुर्यप्रस्थ नावाचं एक महान साम्राज्य होतं. सत्यजित नावाच्या सम्राटांनी त्या साम्राज्याची कीर्ती सबंध भारतभर पोचवली होती. पण महापुरुषांच्या घरात सगळे महापुरुषच जन्माला येतात, असं थोडीच आहे? सत्यजितांचेच पुढच्या पिढीतील वंशज महाराज चंद्रकेतू हे शूर, पण विलासी. काही काळानंतर तर त्यांच्या इतर समर्थ आणि लायक अधिकाऱ्यांनी सम्राटांच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडायला सुरुवात केली, आणि सम्राट मदनिकांच्या संगतीत मश्गूल होत गेले. राजाचं आपल्या राज्याकडे जितकं जातीनं लक्ष असायला हवं, ते नसल्यावर आणि हाताखालील अधिकाऱ्यांच्या कर्तृत्वाला आणि महत्त्वाकांक्षेला रोज नवे अंकुर फुटत असताना त्या राज्याचं भविष्य यादवीच्या कृष्णच्छायेत झाकोळलं जाणार, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नसते. एकीकडे सम्राटांच्या चरणावर आपली राजनिष्ठा वाहिली आहे, असं भासवून राजसिंहासनावर अधिष्ठित होण्याची महत्त्वाकांक्षा उरी बाळगणारा क...