Posts

Showing posts from 2022

My Man Jeeves

Image
While reading one article written by my favourite Marathi humourist P.L. Deshpande, I was quick to notice one name he mentioned. He mentioned that his favourite humourist was P.G. Wodehouse. Before that, I didn't know anything about him, but my great dear PuLa introduced him to me. One day while roaming through my college library (having the best time of that day), I suddenly saw this book My Man Jeeves written by PG Wodehouse. Without any second thought,I picked it up and by Jove, that was the best shot ever!  My Man Jeeves is a collection of short stories by P. G. Wodehouse, first published in the United Kingdom in May 1919 by George Newnes. Of the eight stories in the collection, half feature the popular characters Jeeves and Bertie Wooster , while the others concern Reggie Pepper, an early prototype for Bertie Wooster. Bertie belongs to an aristocratic family from London, who has a very easy- to- go approach towards his life, who likes to worry less and enjoy more...

परीक्षेला पर्याय काय?

Image
प्रत्येकाचं वर्षाचं कॅलेंडर दिवस सारखेच असले, तरी वेगळंच असतं. आम्हा शिक्षकी पेशातल्या लोकांचं तर total वेगळंच म्हणा ना! आम्ही निकाल- प्रवेश - परीक्षा आणि पुन्हा निकाल हे चार हंगाम जगणारी माणसं आहोत. या मुख्य गोष्टी सांभाळत आम्ही शिकवत असतो. एक पाठ्यपुस्तक, प्रत्येक धड्याला इतक्या तासिका, इतक्या तासिकांत एवढं शिकवून झालं पाहिजे असं टार्गेट, जोडीला क्लास टेस्ट मग सहामाही वार्षिक हेच आमचं life आहे. क्रमिक पुस्तक ही एवढी बुलंद चौकट असते, की ती तोडून शक्यतो बाहेर पडताच येत नाही. अर्थात काही याला अपवाद आहेत. पण बहुतेक सगळेच विद्यार्थी - पालक आणि शिक्षक पुस्तकांना आणि परीक्षेला त्याच्या निकालाला शरण गेलेले असतात. कधी कधी प्रश्न पडतो, की याचं फलित काय? आपण हे मुलांना शिकवतो ते त्यांना कळलं किती ते जाणून घेण्यासाठी परीक्षा घेतो की त्यांची नेमाने परीक्षा घेता यावी म्हणून त्यांना शिकवतो आहोत? खरं मान्य करायची तयारी असेल, तर या प्रश्नाचं नेमकं उत्तर सांगता यायचं नाही. मला गेल्या दीड वर्षात आलेला अनुभव असा, की जी कुठेही चमकतीलच अशी मुलं चटकन लक्षात येतात. ती वर्गातही पुढे असतात, परीक्षेतही पुढे अस...

Leaves in the Wind & Pebbles on the Shore A.G. Gardiner aka Alpha of the Plough

Image
     My reading journey keeps on taking many interesting turns all the time. This time it took me to relatively unknown, unventured area that is Essay. One of the most delightful and relaxing yet thought provoking type of genre, it is not that easy to handle. Whenever a list is made of writers who have mastered this type of writing, one name will be there for sure. That name is Alfred George Gardiner aka Alpha of the Plough!          A G. Gardiner, one of the renowned essayists of modern times, contributed to The Star(magzine) under the pseudonym Alpha of the Plough from 1945. Most of his essays were written during the war, and first appeared in book form during the war. Talking specifically, all these essays are the literary diversions of a time of great public anxiety and heavy personal tasks. Writing them is a happy distraction from unhappy things, and now that the great wind has passed it is a pleasure to find the leaves it blew down gathered ...

मेळघाटावरील मोहर: डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे

Image
निगिजे पूर्वीलिया मोहरा |कीं येईजे पश्चिमीचीये घरा निश्चळपणे धनुर्धरा| चालणे एथिचें|| येणे मार्गे जया ठाया जाइजे| तो गावों आपणचि होईजे| हे सांगो काय सहजें| जाणसी तूं|| - एखाद्या विशिष्ट गावाच्या (ध्येयाच्या) दिशेने स्थिर चित्तानं वाटचाल करणारी माणसं एक दिवस आपणच ते गाव (ध्येय) बनून जातात. ( ज्ञानेश्वरी )      तीन चार वर्षांपूर्वी झी मराठीवर उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेचा सन्मान केला गेला. त्यांचं नाव पुकारलं गेलं, तशा त्या उठल्या. आपल्या बाजूलाच बसलेल्या पतीच्या पाया पडल्या आणि व्यासपीठावर जाऊन त्यांनी पुरस्कार स्वीकारला. आपण कोणत्या परिस्थितीत कसल्या प्रकारचं काम काय भूमिकेतून करतो आहोत, यावर नेमकंच पण मुद्देसूद असं त्या बोलल्या. त्या होत्या डॉ. स्मिता कोल्हे आणि प्रेक्षकांत बसून डोळ्यांत पाणी आणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांना दाद देणारे त्यांचे पती म्हणजे डॉ. रवींद्र कोल्हे. इथे मला पहिल्यांदा कोल्हे दाम्पत्याची माहिती मिळाली. हे दोघे मेळघाट नावाच्या आदिवासी बहुल भागात समाजकार्य करतात, इतकंच मला माहीत होतं. त्यात हे पुस...

A Reader's Reflections

     #पुस्तकांच्या_पानांवरुन        जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतात. वाचन आणि वाचकांबद्दल सुध्दा असंच म्हणावं लागेल. प्रत्येकाची आवड, वाचायची पद्धत वेगवेगळी असू शकते. काही वाचक एकावेळी एकच पुस्तक वाचतात. काही at a time चार पाच पुस्तकं वाचत असतात. कुणाला कादंबरी आवडते, कुणाला चरित्र-आत्मचरित्रपर लिखाण आवडतं, कुणाला विनोदी तर कुणाला अध्यात्मिक विषयही आवडीचा असू शकतो. मला हेच पुस्तक का आवडतं, याला काही ठोस उत्तर असायलाच हवं असं नाही . काही पुस्तकं खूप नावाजलेली असतात, पण ते पुस्तक हौसेने वाचायला घ्यावं नी पत्ता चुकल्यासारखं वाटून जातं. तर कधी क्वचित निव्वळ योगायोगाने एखादं नेहमीच्या आपल्या आवडीच्या विषयांपेक्षा वेगळं पुस्तक वाचनात येतं आणि कायमचं तुमच्या मनात घर करुन जातं. आम्ही English Literature मधे उत्तम साहित्याचे गुण शिकलो होतो. Good literature is a literature which is universal, transcends the age in which it was created, plus which has multiple layers of meanings.      तुम्हाला असा अनुभव आहे का, की एखादं पुस्तक तुम्ही पहि...

मोठी तिची सावली

Image
पुस्तकांच्या पानांवरून "मी कल्पवृक्षाच्या तळवटी बसलेली आहे. त्याची सावली छान विस्तारली आहे. कित्येक वसंत अनुभवले. शिशिरातली पानगळही पाहिली. अनेक पक्ष्यांनी या वृक्षाच्या आधारानं घरटी बांधली, अनेकांनी फळं चाखली. अज्ञानी जनांनी त्यावर कुऱ्हाडीही चालवल्या. कुणाबद्दलही राग, आकस न धरता साऱ्यांना शीतलता देत सावली मोठीच होत आहे. ... आणि मला कळत नाहीये की, क्षणोक्षणी मोठ्या होणाऱ्या सावलीकडे पाहू की जन्माची संगतसोबत करणाऱ्या माझ्या छोट्याशा ताईला पाहू? "हे शब्द आहेत मीना मंगेशकर- खडीकर यांचे आणि त्या ज्यांना आदराने महावृक्षाची उपमा देत आहेत, त्या आहेत तुमच्या आमच्या सर्वांच्या दीदी अर्थात गानकोकिळा लता मंगेशकर.  मोठी तिची सावली या प्रवीण जोशी यांनी शब्दांकन केलेल्या आपल्या या पुस्तकात मीना ताईंनी आपल्या दीदींच्या अनेक हृद्य आठवणी लिहून ठेवल्या आहेत. दीदी नावाचा सुरांचा महासागर माहीत नाहीत, इतका क्वचितच कुणी कोरडा मनुष्य असेल. आधीच्या, आत्ताच्या आणि असंख्य सुरसाधक आणि प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लतादीदी आपल्याला दिसल्या, पण त्या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठीचा त्यां...

वारसा: नरहर कुरुंदकर

Image
  #पुस्तकांच्या_पानांवरुन        काही पुस्तकं आकाराने खूप छोटी असतात, पण वाचता वाचता संपत नाहीत. थोडक्याच शब्दांत आशय इतका ठासून भरलेला असतो, की वाचणाऱ्या व्यक्तीचा कस लागला पाहिजे. यावेळी वाचलं ते पुस्तक अशा प्रकारचं होतं. नरहर कुरुंदकर हे नाव खूप ऐकूनसुद्धा आजतागायत त्यांचं कोणतंच साहित्य मला वाचायला मिळालं नव्हतं. गेल्या आठवड्यात शेवटी एकदाचा हा दुष्काळ संपला, आणि माझ्या हाती पडलं ते त्यांचं वारसा हे पुस्तक. अगदी साजेशा नावाचं, महाभारताशी संबंधित विविध घटकांचा तर्कशुद्ध आढावा घेणारे चार लेख यात समाविष्ट आहेत.      पहिला लेख डॉक्टर सुखटणकर यांनी संपादित केलेल्या महाभारताच्या चिकित्सक आवृत्ती विषयी आहे. महाभारत हा विषय समग्र भारतातल्या जनमानसात इतका खोलवर रुजलेला असल्यामुळे; प्रांत, भाषा, संस्कृती नुसार अनेक प्रकारच्या कथा, दंतकथांची भर वेळोवेळी मूळ कथानकात पडत गेली आहे. त्यातून सध्या आपल्यासमोर असणारं महाभारत यातील मूळ कथानक आणि प्रक्षिप्त भाग अशी वर्गवारी करताना आलेल्या अडचणी अनेक प्रकारच्या आहेत. त्यातून मार्ग काढत डॉक्टर सुखटणकर यांनी ...

उदासबोध : उदास मनाच्या जनतेचं,आणि त्यांना उदास करणाऱ्या व्यवस्थेचं विडंबन!

Image
समर्थाचिया सेवका वक्र पाहे ऐसा गल्लीगल्लीत गुंड आहे त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे  पोलिस पुढाऱ्यांचे या सत्याचा लागता शोध कुठून सुचता दासबोध? लिहिला असता उदासबोध श्रीसमर्थांनी ! पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पाडगावकरांचं रामदास स्वामींच्या रुपातलं चित्र पाहून मन थोडं साशंक झालं खरं! कारण समर्थांवर असणारी आमची अपरंपार श्रद्धा. पण चित्र नीट पाहिलं की दिसतं, की एकमेकांचे पाय धरत-ओढत, कसही करुन जो खुर्चीवर बसला आहे, त्याच्या, म्हणजेच पर्यायाने खुर्चीजवळ पोहोचण्याची धडपड करणारी सगळी सारख्याच साच्याची माणसं आणि त्यांची लांबच लांब रांग मागे ; आणि तिच्या पुढे तिच्यापासून वेगळे उभे असलेले ,भव्यदिव्य दिसणारे, स्वतःचा चेहरा असणारे समर्थांच्या वेशातले पाडगांवकर! अर्पणपत्रिकेत आचार्य अत्रे यांच्या स्मृतीस अर्पण हे वाचलं, आणि विषयाची कल्पना यायला लागली. त्यापुढेच एक अतिशय बोलकं चित्र आहे. "आपले किंमती मत द्या" या फलकाच्या बाजूला काही चिलटांचा घोळका दाखवला आहे. एक एक चिलट जाळीतून आत जातं, आणि समोरच एका अदृश्य हातात एक मोठं fly swatter दाखवलं आहे. आजच्या लोकशाहीचं समर्पक चित्रण दुसरं काय असू शकेल?  ...

श्रीगीता आणि गीतांबरी

Image
#पुस्तकांच्या_पानांवरुन "समोर उभे असलेले माझे आप्तस्वकीय, मित्र हे सारे आमच्याकडून या युद्धात मारले जातील!मग कृष्णा, त्यांना मारून आम्ही राज्य तरी कुणावर करायचं? पराक्रम गाजवून ज्यांच्यासाठी राज्य करायचं ती आचार्यादी मंडळी या युद्धात उतरली आहेत. त्यांनी आपले प्राण आणि धन या गोष्टी पणाला लावल्या आहेत. या मंडळींवाचून राज्यभोग व्यर्थ आहे. या सर्वांना मारुन त्रैलोक्याचं राज्य जरी मिळालं, तरी मला ते नको आहे..." दोन्ही बाजूंचा विशाल सैन्यसागर समोर उभा असताना युद्धाच्या भीषण परिणामांची कल्पना येऊन अर्जुनाने आपलं विजयी धनुष्य खाली ठेवलं. आणि मग या किंकर्तव्याविमुढ वीराला आणि भक्ताला त्याच्या विहीत मार्गावर पुनः आणण्यासाठी सांगितलं गेलं ते अजरामर तत्वज्ञान म्हणजे श्रीम्भगवद्गीता!  नववर्षाच्या वाचनसंकल्पात श्रीम्भगवद्गीता आणि संबंधित वाचन हा एक प्रमुख संकल्प केला होता. आणि मी अतिशय समाधानाने हे सांगू शकते, की नववर्षाचे पहिले पंधरा दिवस माझे गीता वाचण्यात गेले आहेत. या वाचनाने झालेली अनुभूती शब्दांत वर्णन न करता येण्यासारखी आहे. भारतीय तत्त्वज्ञानाच्या विश्वात गीता ध्रुवताऱ्...