Posts

Showing posts from December, 2023

द लिजंड ऑफ बहिर्जी - नाईक ( सुरतेवर छापा - पुस्तक पहिले

Image
द लिजंड ऑफ बहिर्जी - नाईक ( सुरतेवर छापा - पुस्तक पहिले) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध गुप्तहेरांच्या महान कारवायांची आणि मराठा साम्राज्याच्या उदयाची कहाणी सन १६६३. शिवाजी राजांच्या चिमुकल्या स्वतंत्र स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी उत्तर दक्षिणेकडे शत्रू सरसावून बसले आहेत. नुकताच मुघल सुभेदार शाहिस्तेखान पुण्यात त्याच्या सर्व सैन्यानिशी तळ ठोकून बसला आहे. स्वराज्यासाठी तन मन धन अर्पण करायला सज्ज मावळ्यांच्या नशिबी ‘ रात्रंदिन युद्धाचा प्रसंग’ आहे. यांना ही लढाई किती वेळ चालणार ठाऊक नाही. पण आहे तो शिवाजीराजेंवर असणारा ठाम विश्वास. राजे आपण उभं केलेल्या स्वराज्याची वाताहात होत असताना पाहत आहेत. ते दुःख आणि जोडीला मात्र वेगळ्याच विवंचना आहेत. सततच्या लढायांनी त्रस्त सरदार आता मुघलांशी तह करायचा सल्ला देत आहेत. तर स्वराज्याची आर्थिक स्थिती इतकी ढासळली आहे, की सैन्याला वेतन देण्याइतकेही पैसै शिल्लक राहिलेले नाहीत. अशा डळमळीत परिस्थितीत राजांनी जातीने छापा घालून शाहिस्तेखानाला शास्त केली. पण अजूनही समस्या संपल्या नव्हत्या. स्वराज्य पुन्हा उभं करायचं होतं, त्यासाठी लागणारं प्रचंड आर्थ...

तुका 'राम' दास

Image
तुका ‘राम’ दास नावाचा महिमा किती मोठा हे काही पुस्तकांकडे बघूनच कळतं. वरती तुका मधे राम खाली दास तुका ‘राम’ दास असं चमत्कृतीपूर्ण नावाचं पुस्तक मला वाचायला मिळालं, याबद्दल माझं मलाच खूप कौतुक आहे. तसे आपले संत परंपरेतील सगळेच संत वंदनीय आहेत, पण माझा personal लोभ ज्यांच्यावर आहेत ते दोघे तुकाराम महाराज आणि समर्थ. यांचं, यांच्यावर लिहिलेलं कितीही साहित्य वाचावं, तरी ते कमीच. ‘ सिंधू न मावे रांजणी’ तसा प्रकार. या संतांनी आपल्या आयुष्यभराची साधना खर्ची घालून आपल्यासारख्या “पामरांच्या” दृष्टीला पुरेल इतकं बोधांजन तयार करुन ठेवलं आहे. आपण फक्त तिथवर पोहोचलं पाहिजे. पण आपण आधुनिक एकविसाव्या शतकात राहणाऱ्या so called साक्षर आणि प्रगत लोकांनी या संतांना विशिष्ठ जाती, समजुतींच्या चौकटीत अडकवून ठेवलं आहे. यातून बाहेर पडून खरा नीरक्षीर विवेक दाखवून बुद्धीच्या कसोटीवर जोवर आपण हे साहित्य पडताळून पाहत नाही, तोवर आपण फक्त साक्षरच असू, सुशिक्षीत नव्हे. हे साध्य करण्यासाठी या संतांच्या लोकप्रिय असणाऱ्या प्रतिमेपलीकडे जाऊन त्या व्यक्तीचं साहित्य, वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी घेतलेली भूमिका उलगडून सांग...

मनाचिये द्वारी

Image
मनाचे श्लोक लहानपणी कानावर पडलेले. शाळेत एकसुरात श्लोक म्हटल्याचं आठवतं. पुढे psychology चा अभ्यास करताना मनाचे श्लोक वेगळ्या अर्थी समजत गेले. कधीही जरा relax व्हावंसं वाटलं, तर रविंद्र साठेंच्या घनगंभीर तरीही थेट काळजापर्यंत पोहोचणाऱ्या आवाजातले मनाचे श्लोक ऐकणं हा एक उत्तम पर्याय माझ्याकडे असतो. का माहीत नाही, पण हे श्लोक मनाला भावतात. त्यांची ओळख पटते. आत्ताच ग्रंथालयात सच्चिदानंद शेवडे लिखीत मनाचिये द्वारी हे पुस्तक मिळालं. एकूण २०५ मनाच्या श्लोकांचं एकेक करुन सुंदर निरुपण केलेलं आहे. त्यामुळे हे compulsorily वाचलंच पाहिजे, असं पुस्तक आहे.  या पुस्तकात मूळ श्लोक, त्याचा अर्थ आणि विवेचन असा क्रम ठेवला आहे. हे पुस्तक पूर्वी महाराष्ट्र टाईम्स आणि नवशक्ती वृत्तपत्रांतून आलेल्या सदराचं पुस्तकी रूप आहे. लिहीत असताना त्या काळी लिहिलेले श्लोक आजच्या चंगळवादी, भौतिक पातळीवरच अधिक जगणाऱ्या, स्वमग्न माणसाच्या आयुष्यातही कसे लागू पडतात, यावर भर दिलेला आहे. विवेचन करताना स्वामी वरदानंद भारती लिखीत ‘ मनोबोध’, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, नामदेव गाथा, प्राचीन ग्रंथ- स्तोत्र - कथा या...