Posts

Showing posts from April, 2023

देवबाभळी: प्राजक्त देशमुख

Image
"एक देवाची बायको, एक भक्ताची बायको. मुळात त्यांची ओळख म्हणजे ' त्या कुणाच्या तरी बायका आहेत ' इथेच त्यांचं अधांतरी असणं दिसून येतं आणि खटकतं. त्यांचं स्वतंत्र म्हणणं काय असेल? त्या कुणावर चिडत असतील तर त्यांचा आवाज कसा असेल? त्यांचे कामानंतरचे सुस्कारे किती दीर्घ असतील? हे सगळं सगळं कुणी का मांडलं नाही की कुणाला दिसलंच नाही? ग्रंथच्या ग्रंथ तुकोबा आणि पांडुरंगावर लिहिलेले असताना त्यांच्या पाठीशी पाठ लावलेल्या आकृत्यांकडे कुणाचंच लक्ष कधी का गेलं नाही? निदान प्रदक्षिणा मारताना तरी? "        विठू माउली ये हाची वर देई संचारोनी राही हृदयामाजी हीच विनवणी वारंवार करणारे, संसाराचं मोहजाल भेदून परम चैतन्यरुपाशी एकरुप व्हायला निघालेले तुकोबा; घरादारावर, मुलाबाळांवर जीवापाड माया करणारी, आपल्या नवऱ्याला भक्तीचं वेड लावणाऱ्या देवाचा सतत पाणउतारा करणारी, पण अशा जगावेगळ्या नवऱ्याचा जगावेगळा संसार मनोभावे करणारी आवली ही एक अद्भुत जोडी. देवाचं नाव घेत भंडाऱ्याच्या डोंगरावर किंवा इतर कुठेही जरी गेले असले, तरी त्यांना शोधून पोटभर भाकरी खाऊ घातल्याशिवाय आवली स्वस्थ बसायची नाही. अशीच एक...

शिष्टाईचे इंद्रधनू

Image
      कधी कधी बातम्यांत आपले विदेश सेवेतले अधिकारी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कुठल्यातरी occasion ला भारताकडे बोट दाखवणाऱ्या, विनाकारण डिवचू पाहणाऱ्या अन्य देशांच्या प्रतिनिधींची सविनय खरडपट्टी काढताना दिसतात. त्यांचं एखादं विधान, कृती पुढचे अनेक दिवस चर्चेत राहते. आपले सर्वोच्च नेतेही अशा अधिकाऱ्यांचं नीट मन लावून ऐकताना दिसतात, तेव्हा शिष्टाई ( diplomacy) या शब्दाची व्याप्ती लक्षात येते. तसं अगदीं जुन्या काळापासून रामायणातील अंगद शिष्टाई, महाभारतातील श्रीकृष्ण शिष्टाई ते अफझलखान भेटीदरम्यानची बोकील पंतांची शिष्टाई किती आणि काय काय साधून गेली, ते सर्वश्रुत आहे. आपली एक समजूत असते, की हे लोक चिक्कार पगार घेतात आणि त्यांना परदेशात निवांत राहायला मिळतं, मानसन्मान मिळतो. पण त्याच जोडीला त्यांना अहर्निश आपल्या देशाची त्या देशात असणारी प्रतिमा आणि स्थान बुलंद राखणं हेच त्यांचं मुख्य काम असतं. यांची एक चूक थेट दिल्लीपर्यंत हादरे पोचवू शकते. अनिवासी भारतीयांच्या बाबतीतले सगळे प्रश्न हाताळणं, कित्येक आंतरराष्ट्रीय करार प्रत्यक्षात राबवणं अशा नानाविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात तेही क...

Animal Farm-George Orwell

Image
      All animals are equal, but some animals are more equal than others.” Groundbreaking piece of literature, one of its kind, a novella of less than 100 pages written in 1945 by George Orwell,is a fable,more accurately,a veiled political satire.You might wonder how anyone can satirize a political system in less than 100 pages, but after reading this book you will realize that there is nothing which is not included in the novella.         The beauty of this novella lies in the fact that if you go on reading it as it is without any background information of certain political movements or revolution, you will enjoy it as an animal fable. It tells the story of a group of farm animals who revolt against their keeper. They want to create a place where all animals are treated equally and where they can be free and happy. They succeed in chasing their owner Mr. Jones away from the farm, and renaming it as an Animal Farm. This time, it is the pigs...

प्रेरणा आणि अंधारातले दिवे

Image
   तुम्ही वाचक असल्यामुळे "एखादं पुस्तक suggest करना' या प्रश्नाचा तुम्हाला कायमच सामना करावा लागतो. त्यातलं कुठलंही पुस्तक सांग, किंवा तुझं सगळ्यात आवडतं पुस्तक सांग असं कुणी म्हटलं तर त्याला उत्तर कसं आणि काय द्यायचं ते ठरवणं एक कसोटीच असते. त्यातही कॉलेजच्या मुलांना किंवा त्यापेक्षाही लहान असणाऱ्या मुलांना वाचायला आवडेल आणि त्यांना काही inspiring मिळू शकेल अशी पुस्तकं असणं आणि ती आपल्याला माहीत असणं या दोन्ही गोष्टी मला खरंच खूप मोलाच्या वाटतात. यावेळी वाचलेली दोन्ही पुस्तकं याच गटात शोभतील अशी आहेत. पहिलं - प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखीत प्रेरणा आणि दुसरं अरुणा ढेरे लिखीत अंधारातले दिवे .        काही नावांची आपल्याला इतकी खात्री पटलेली असते, की यांनी लिहिलेली ओळ न ओळ वाचण्यासारखी आहे, असं आपण ठामपणे सांगू शकतो. मी दहावीच्या सुट्टीत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं दीपस्तंभ आणि जागर वाचलं होतं. 'जीवन त्यांना कळले हो' या बा भ बोरकरांच्या पंक्ती खऱ्या अर्थानं जगलेल्या माणसांची ओळख झाली, यांच्यासारखं जगता आलं पाहिजे याची जाणीव झाली. तेव्हापास...