पुस्तक परिचय : मैत्रेयी ( लेखिका अरुणा ढेरे )
मैत्रेयी
लेखिका : अरुणा ढेरे
प्रकाशक : सुरेश एजन्सी
पृष्ठसंख्या : ८६
पुस्तक परिचय:
एखादं पुस्तक वाचून झाल्यावर किंवा वाचत असताना येणारे अनुभव, ही एक वेगळीच कथा असते. आणि प्रत्येक पुस्तकाची अशी एक खास कथा असतेच. पुस्तक वाचन याबरोबरच माझा दुसरा आवडता छंद म्हणजे पुस्तकांची नावं गोळा करणे! थोडं विचित्र वाटेल, पण मला कुठेही एखादं पुस्तक किंवा लेखक यांपैकी काही नवं निदर्शनास आलं, की ते मी वहीत लिहून ठेवते. सगळी पुस्तकं वाचायला जमेलच असं नाही, पण प्रयत्न तरी तसाच असतो. आत्ता वाचलेलं पुस्तक , अरुणा ढेरे लिखित मैत्रेयी, याची पण अशीच खास गोष्ट आहे. साधारण ३-४ वर्षांपूर्वी आमच्या कॉलेजला अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक सरांचं लेक्चर होतं. आम्ही थोड्या नाईलाजानेच गेलो, पण सरांनी तर एका अर्थी आमचा अपेक्षाभंग केला. आमची कल्पना अशी, की अर्थशास्त्र म्हणजे one sided उपदेश गाथा यातलं काहीतरी, जागं राहता आलं तरी पुष्कळ! पण सर इतके छान बोलत होते,की आम्हीही लहान मुलं गोष्ट जितकी मन लावून ऐकतात, तसं अगदी एका अर्थी तल्लीन होऊन ते लेक्चर ऐकत होतो, सरांना प्रश्न विचारत होतो, सरही खूप छान माहिती देत होते. आणि बोलता बोलता त्यांनी आपल्या वाचनाच्या आवडीबद्दल सांगायला सुरुवात केली, आणि माझे कान लगेच टवकारलेच! तेव्हा त्यांनी या पुस्तकाचा उल्लेख केला होता. आता आपल्याला अरुणा ढेरे हे नाव अगदीच चांगलं ओळखीचं आहे, पण मला त्या वेळी अरुणा ढेरे हे नावच अपरिचीत, आणि त्यातून सरांनी recommend केलेलं पुस्तक म्हणून लगेच लायब्ररीत जाऊन हे पुस्तक वाचायला घेतलं. मोजक्या ८०-९० पानांचं पुस्तक, पण अगदी खरं सांगते, वाचायला मला पूर्ण ५ दिवस लागले होते. आपल्याला लय कळतं, हा जो काही फाजील आत्मविश्वास वाढला होता, तो अगदी हवेत विरून गेला. जेव्हा पुस्तक वाचून झालं, तेव्हा खूप काही नवं आणि दीर्घकाळ टिकणारं असं काहीतरी हाताला लागल्याची भावना होती. तेव्हापासून प्रत्येक सेमीस्टरला एकदा मी हे पुस्तक वाचतेच!
प्राचीन भारतीय वैदिक संस्कृती, मुख्य विचारप्रवाह, स्त्रीयांचे समाजातील स्थान असा विषय निघाला, की ओळीने गार्गी, मैत्रेयी, खना, सावित्री अशा काही विदूषींची नाव घेतली जातात. आणि आश्चर्य म्हणजे आजही मुलींना शिक्षणाची प्रेरणा देताना ही नावं सांगितली जातात. अशा महान विदुषी होऊन गेल्या, ही अभिमानाची गोष्ट आहेच, पण या विदुषींचें नेमके विचार काय होते, हे कोणी सांगू शकेल का? म्हणून आपलं अज्ञान दूर करणं, हाही हे पुस्तक वाचण्याचा एक हेतू होताच.
मैत्रेयी ही सीतेची मैत्रीण, राजर्षी जनकाच्या एका महत्त्वाच्या मंत्र्याची कन्या, पण आपल्या स्वतःच्या विचारांचं भक्कम अधिष्ठान असलेली तरुणी. सर्व सुखासीनता उपलब्ध असतानाही परम सत्य आणि शाश्वताचा अर्थ आपल्या बुद्धीने लावू पाहणारी एक विचारी कन्या. हीच सत्याची ओढ पुढे मंत्रद्रष्टे ऋषी याज्ञवल्क्य यांच्याशी विवाह झाल्यावर वाढीस लागली, बहरली. राजवाड्यात वाढलेली ही तरुणी आपला संसार आनंदाने एका पर्णकुटीत सजवू लागली. पुढे आपल्याच आयुष्याकडे तटस्थपणे पाहण्याची वृत्ती निर्माण होत गेली, आणि निसर्गातल्या प्रत्येक घटकाशी तादात्म्य होण्याची क्षमताही वाढीस लागली. केवळ आपल्या पतीकडून ज्ञान मिळवलं असं मन नाही, तर पतीच्या ज्ञानातही जिने मोलाची भर घातली, अशी मैत्रेयी. ही मैत्रेयी केवळ पत्नी न राहता, साऱ्या चाकोरीबद्ध मर्यादा तिच्याही नकळत ओलांडत याज्ञवल्क्य यांची एक सखी बनून गेली. या विचारसंपन्न जोडप्याचं हे जगावेगळं सहजीवन पती पत्नीच्या नात्याचा वेगळाच पैलू उलगडून दाखवतं. दोन माणसं केवळ शरीराने नाही तर मनाने एकरूप होणं म्हणजे काय, हे या दोंघांकडे पाहताना लक्षात येतं. शब्दांचा कोणतंही मोहोळ न उठवता आपल्या रोजच्या जीवनात आलेल्या अनुभवावरून अनेक क्लिष्ट संकल्पना सहज उलगडून सांगू शकणारी मैत्रेयी मनात घर करते.एक उदाहरण द्यायचंच झालं तर, भाग ११ मधे मैत्रेयी ने दिलेलं एक उत्तर. याज्ञवल्क्य ऋषींनी आपल्या शिष्यांना विचारलेला एक जटिल प्रश्न , ज्यात तीन वस्तू शोधायला सांगितल्या जातात: सर्वात कठीण आणि तितकीच मऊ अशी एक, पूर्ण शुद्ध नी बाह्य वस्तुजाताच्या मदतीशिवाय घडवलेली दुसरी आणि जी मिटून ही उघडी, देऊनही उरलेली, स्थिर असूनही गतिमान, अणु असूनही अपार अन् निर्बल असूनही सामर्थ्यवान अशी तिसरी, अशा तीन गोष्टी कोणत्या हा प्रश्न विचारला असता, या तीनही गोष्टी सामावून घेवू शकेल अशी मैत्रेयीने सुचविलेली गोष्ट म्हणजे प्रेम ! हे उत्तर एका स्त्रीचंही आहे, एका सखीचंही आणि एका विदुषीचंही!
विश्वाच्या रचनेत वारा,पाणी याचं नेमकं स्थान काय अगदी इथपासून ते काळाचं चक्र आणि स्वरूप, आत्मा, गुरूची कर्तव्ये, सृष्टीची रचना आणि त्यातील स्त्री पुरुषाचं स्थान, रतीचं महत्त्व, ते अगदी संवाद- विसंवाद, परब्रह्माचा साक्षात्कार अशा एकाहून एक जटिल पैलूंवर लीलया आपले स्वतःचे अनुभवाचं कोंदण लाभलेले विचार मांडणारी मैत्रेयी आपलं विदुषीपण वाचकांपुढे सहज सिद्ध करते आणि दुसरीकडे सर्वसामान्य स्त्रीची सारी कर्तव्य मनापासून पार पाडतानाही दिसते. एक आदर्श पत्नी, आदर्श माता याही पेक्षा मैत्रेयी लक्षात राहते ती याज्ञवल्क्य ऋषींची पत्नीपेक्षा अधिक सखी असलेली एक विचारवंत म्हणून. याज्ञवल्क्य आपल्या अाश्रमधर्माला अनुसरून वानप्रस्थाश्रम स्वीकारण्यापूर्वी आपल्या दोन्ही पत्नींमध्ये संपत्तीची वाटणी करण्याचा निर्णय घेतात. पतीच्या वियोगाचं अपरंपार दुखः झालेल्या मैत्रेयीचं शालीन स्त्रीत्व मनाला स्पर्शून जातंच. पण अखेरच्या वाटणीतसुद्धा पतीकडून आत्मज्ञान मागून मैत्रेयी पुन्हा आपल्या विचारसामर्थ्याची दिव्य अनुभूती आपल्याला देते.
मोजक्या ८६-८८ पानांचं हे पुस्तक, पण मला हा एक अमूल्य ठेवा वाटतो. लेखिकेने कुठेही मैत्रेयीचा इतिहास सांगण्याचा आटापिटा न करता मैत्रेयीचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच ही मैत्रेयी कोणी ऐतिहासिक, पौराणिक व्यक्ती एवढीच मर्यादित न राहता उपनिषदांतून आपल्या सूक्तांच्या रुपात विचारांचा अविनाशी वारसा ठेवून गेलेली विचारवंत आर्य स्त्री म्हणून लक्षात राहते. कुठेही मैत्रेयी आणि तिचं विचार विश्व झाकोळलं जाईल, अशी कोणतीही कल्पना, भाषाशैली, शब्दरचना लेखिकेने या लेखनात कटाक्षाने टाळली आहे. पण तिला कोणीतरी रुक्ष, शब्दप्रभू पंडित म्हणूनही दाखवलं नाही. तिच्या एकंदर आचार विचारांमधली सहजता, अकृत्रिमपणा मैत्रेयीचं एक निर्दोष समग्र विचारचित्र आपल्यापुढे सादर करण्यात यशस्वी ठरते.
जसं मी आधीच लिहिलं आहे, हे पुस्तक माझ्यासाठी एक ठेवा आहे. मुद्दाम मी ते विकत घेतलं नाहीये, आणि घेणारही नाही. एकदा पुस्तक विकत घेतलं की काही दिवसांनी ते परत करायची सक्ती राहत नाही, आणि एका अर्थी त्याचं महत्त्व कमी होऊन जातं. सात ते दहा दिवसात परत द्यावं लागणारं पुस्तक ज्या तत्परतेने आणि उत्साहाने वाचलं जातं, तसं विकत घेतलेल्या पुस्तकाबद्दल होत नाही. म्हणून हे पुस्तक मी मला वाटेल तेव्हा लायब्ररीतून घेऊन वाचणार आहे. आजवर ४-५ वेळा वाचून झालं, तरीही दर वेळी काही तरी नवा अर्थ या पुस्तकातून मिळत जातो. म्हणूनच एका वेगळ्या अनुभवासाठी जरूर वाचावं असं हे पुस्तक,अरुणा ढेरे लिखित मैत्रेयी !
( सद्ध्या एस. एल. भैरप्पा लिखित आवरण हे पुस्तक वाचत आहे. काही पुस्तकं आनंद देतात, काही ज्ञान देतात. या पुस्तकाने आजवर न जाणवलेली अस्वस्थता आणि वेगळी दृष्टी दिली आहे. इतकं हलवून टाकणारं पुस्तक बरेच दिवसात वाचलं नव्हतं. एका बैठकीत वाचायचा बेत होता, पण डोकं अक्षरशः भंजाळून गेलं, असा विषय आहे. म्हणून हे परीक्षण लिहायला घेतलं. आता ते पुस्तक वाचायचं आहे. )
- नेहा प्रदीप जोशी
१२.१.२०२०.

Comments
Post a Comment