लेखकाची गोष्ट
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पुस्तकांच्या उंच भिंतीवर बसलेला एक माणूस दिसतोय. त्याच्या उंचीला आधार त्याने वाचलेल्या पुस्तकांचा आहे. भविष्यात मला माझं असं एक चित्र काढून घ्यायला नक्कीच आवडेल! " लेखक म्हणजे भानात येणं. लेखक होणं म्हणजे केवळ भाषा कमावणं नाही. लेखक म्हणजे पर्सनल ओळखीपाळखी वाढवणं नाही. लेखक म्हणजे सुहास्य वदनानं साहित्य क्षेत्रातल्या ज्येष्ठांना वंदन करणं नाही. लेखक होणं म्हणजे भोळ्या भाबड्या वाचकांमध्ये मिरवणं तर अजिबातच नाही..." मग लेखक म्हणजे काय ते सांगतायत स्वतः एक लेखक! लेखकाची गोष्ट: अ सर्व्हायवल गाईड फॉर मराठी रायटर्स या नावातच अशी काही जादू आहे, की कुठलाही क्युरियस वाचक हे नक्की हातात घेईल. पुस्तकाच्या नावाचं आणि मुखपृष्ठाचं महत्त्व पटवून देईल, असं हे पुस्तक. लेखक विश्राम गुप्ते वाचकांच्या कोर्टात एक लेखक म्हणून आपली बाजू मांडायची रीतसर परमिशन घेतात. या कोर्टातले जज म्हणजे सगळे वाचक, म्हणून त्यांना युवर ऑनर असं संबोधून सुरु होतं हे एक हटके अपील! फर्स्ट ऑफ ऑल, मला या पुस्तकाच्या टायटलबद्दल थोडं सांगावंसं वाटतं. विश्राम गुप्ते चरित...