Posts

Showing posts from November, 2020

महाकवी श्री कालिदासाचे मेघदूत: मराठी अनुवाद शांता ज. शेळके

Image
#मेघदूत #मराठी_मेघदूत #कविकुलगुरू_कालिदास #शांता_शेळके #rediscovering_the_Classics (पोस्ट थोडी मोठी असणार आहे,  वेळ काढून मन लावून वाचा!) महाकवी श्री कालिदासाचे मेघदूत :  मराठी अनुवाद शांता ज. शेळके - अभिजात संस्कृत साहित्याला मराठीची अजरामर मानवंदना!  "That praises are without reason lavished on the dead, and that the honours due only to excellence are paid to antiquity, is a complaint likely to be always continued by those, who, being able to add nothing to truth, hope for eminence from the heresies of paradox; or those, who, being forced by disappointment upon consolatory expedients, are willing to hope from posterity what the present age refuses, and flatter themselves that the regard which is yet denied by envy, will be at last bestowed by time..." Preface to Shakespeare या आपल्या टीकात्मक निबंधात डॉ. सॅम्युएल जॉन्सन यांनी सुरुवातीलाच ," हॅ , काय ते जुनं पुराणं outdated साहित्य वाचता?" , या कुत्सित शेऱ्याला दिलेलं हे सणसणीत प्रतिउत्तर आहे. शेक्सपिअरच्या साहित्य...

शांताराम :एका इंग्रजी भाषिकाच्या मराठी नावाच्या इंग्रजी गोष्टीचा मराठी अनुवाद!

Image
शांताराम- एका इंग्रजी भाषिकाच्या मराठी नावाच्या इंग्रजी गोष्टीचा मराठी अनुवाद!) लेखक: ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स मराठी अनुवाद: अपर्णा वेलणकर #पुस्तकांच्या_पानांवरुन पुस्तक वाचताना आणि ते वाचून झाल्यावर येणारा अनुभव हा प्रत्येक वेळी वेगळाच असतो. काही वेळा ' झालं बुवा एकदाचं पुरं' ही भावना असते. काही वेळा 'इतक्यात का संपलं, अजून थोडं लिहिलं असतं तर काय बिघडलं असतं' अशी चुटपुट लागून राहते. कधीतरी आपण काहीशा अनिच्छेने एखादं भलंमोठं पुस्तक वाचायला घेतो, रटाळ निघालं तर लगेच वाचन बंद करायचं हे आधी ठरवून! पुढे तर ' माझी इच्छा आहे हे पुस्तक अर्ध्यात वाचून सोडायची, पण पुस्तकाची तयारी आहे का मला सोडायची?' अशी फिरकीही काही पुस्तकं घेत असतात. ती वाचून झाली की काहीवेळ स्थब्ध, स्तिमित व्हायला होतं. इतके दिवस ते पुस्तक पानागाणिक तुम्हाला वळणा वळणांनी हिंडव हिंडव हिंडवत असतं. आणि आता एकाएकी तो प्रवास संपून तुम्ही खऱ्या जगात आलेले असता.हा अनुभव देणारं हे पुस्तक... शांताराम!  ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स या ऑस्ट्रेलियातील मॅग्झिमम  सेक्युरिटी प्रिझन मधून फरार झालेल्या पूर्वाश्रमीच्या एक...