Posts

Showing posts from 2019

सुमा करंदीकर लिखित रास ( पुस्तक ओळख )

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते… स्त्रीची महती, थोरवी गायची झाली की वापरायला साधी, सोपी असणारी ही ओळ ! पण या वाक्यात दडलेलं एक सोप्पं सत्य मला आता कळू लागलं आहे. यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, म्हणूनच कदाचित तो पुढे जाऊ शकतो, जेणेकरून ती मागील सगळी आघाडी सांभाळू शकेल. अशाच एका स्त्रीची जीवनकहाणी आत्ता काही दिवसांपूर्वी वाचनात आली. विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर यांचे आत्मचरित्र "रास"! सगळ्यात आधी तर माझी डॉक्टर मैत्रीण अपर्णाताई हीचे मनापासून आभार, जिने हे पुस्तक मला सुचवलं. आता विंदा करंदीकर यांची ज्याला नव्याने ओळख करून लागणार असेल, त्याने त्वरित आपल्या मराठीपणाची पुन्हा एकदा खात्री करून घेतलेली बरी! आपल्या कवितांतून मराठी भाषेला नानाविध सुरेख शब्दालंकर वाहून नवे सौंदर्य बहाल करणारे शब्दप्रभू म्हणजे विंदा ! आता कवी म्हटलं, की त्यांचं व्यक्तिमत्त्व कायम चारचौघांपेक्षा वेगळं, काहीसं गूढ असंच असतं. अशा सुंदर सुंदर कविता लिहिणाऱ्या कवीच्या कवितांमागे ती कोणती ' प्रेरणा ' असेल, याची उत्सुकता आपल्याला असतेच. अशा काही प्रश्नांची उत्तरं देणारं, हे पुस...

गुलाम : स्पार्टाकस ते ओबामा ( गुलामगिरीचा जीवघेणा चित्तथरारक प्रवास) पुस्तक ओळख

गुलाम : स्पार्टाकस ते ओबामा ( गुलामगिरीचा जीवघेणा चित्तथरारक प्रवास) लेखक : अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते. वाचनाच्या प्रवासात काही लेखक असे असतात, ती त्यांचं फक्त नाव दिसायचा अवकाश, की ते पुस्तक लगेच उचलून वाचायला घेतलंच पाहिजे, इतका विश्वास त्यांनी संपादन केलेला असतो. अर्थात हे लेखक कोण असतील, हे प्रत्येकाच्या आवडीनिवडी नुसार ठरत असतं. मला खूप आवडणारा एखादा लेखक वा लेखक दुसऱ्याला आवडेलच असं नाही. पण काही मात्र निर्विवाद ग्रेटच असतात. माझ्यासाठी असं एक नाव म्हणजे अच्युत गोडबोले! झपूर्झा मुळे या लेखकाने मन जिंकून घेतलं कारण English literature हा खूप मोठा weak point ! त्यानंतर ओळीने त्यांची सगळीच पुस्तकं वाचली. किमयागार, मुसाफिर, मनात, कॅनव्हास आणि आता अतुल कहाते आणि अच्युत गोडबोले यांनी लिहिलेलं गुलाम : स्पार्टाकस ते ओबामा ( गुलामगिरीचा जीवघेणा चित्तथरारक प्रवास) ! American literature साधारण दोन वर्षांपासून शिकत असल्यामुळे गुलामगिरी हा विषय बराच प्रकर्षाने समोर आला होता. शतकानुशतके, जगाच्या वेगवेगळ्या खंडांमध्ये माणसांनी माणसांचीच केलेली जगजाहीर घृणास्पद विटंबना म्हणजे गुलामगिरी. ...

My blog

My blog is all about appreciating beauty, that I find in everything, everywhere!