Posts

Showing posts from 2026

नवी पिढी नव्या वाटा

Image
पुस्तकांच्या पानांवरुन  आत्ता डिसेंबरमधे Pune Book Festival च्या निमित्ताने माझी पुस्तक दिवाळी साजरी करुन झाली. त्यातलं एक पुस्तक वाचायला मी स्वतः खूप उत्सुक होते ते म्हणजे नवी पिढी नव्या वाटा हे डॉ. प्रकाश आमटे यांचं पुस्तक, ज्याचं शब्दांकन गौरी कानेटकर आणि प्रीती छत्रे यांनी केलं आहे. कुष्ठरोगी बांधवांच्या जीवनात आनंद फुलवणारे महान समाजसेवक म्हणून बाबा आमटे सर्वांना परिचीत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या पुढच्या पिढीने समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. डॉ. विकास व भारती आमटे आनंदवनचा प्रकल्प उत्तमपणे सांभाळत आहेत. तर डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनी गडचिरोली येथील भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी लोकबिरादरी प्रकल्पामार्फत भरीव काम केलं आहे. या कामाची दखल घेऊन या उभयतांना २००८ साली आशियातील नोबेल मानले जाणाऱ्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८५ साली बाबा आमटेंनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. एकाच घरातील दोन पिढ्यांना समाजकार्यासाठी सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार मिळणे, ही विशेष कौतुकाची गोष्ट आहे. डॉ. प्रकाश आ...