पुरुषः अस्वस्थ रहस्याचा शोध
पुरुषः अस्वस्थ रहस्याचा शोध मराठी वाचकाला निखळ अभिमान वाटावा अशी एक सातत्यपूर्ण साहित्यीक परंपरा म्हणजे दरवर्षी प्रकाशित होणारे वेगवेगळ्या विषयांवर आधारित दिवाळी अंक. रसिक वाचकांसाठी विचारांची आणि मनोरंजनाची पर्वणी हे दिवाळी अंक गेले काही वर्षे उपलब्ध करुन देत आहेत. यावेळी प्रथमच एक दिवाळी अंक अखंड अगदीं अथ ते इती वाचून काढला. कारण त्याचा विषय आणि मांडणी. लोकमतचा २०२३ सालचा दीपोत्सव अंक. विषय पुरुष- ‘अस्वस्थ’ रहस्याचा शोध. संपादक अपर्णा वेलणकर यांची मुद्देसूद आणि संवेदनशील प्रस्तावनाच या विषयाची व्याप्ती समजून घ्यायला उपयोगी पडते. त्या म्हणतात, “ पुरुष हा प्राणी सध्या एकूणच ‘ आरोपीच्या पिंजऱ्या’त उभा आहे आणि त्याला सबळ कारणेही आहेत. पण तरीही त्याच्या खांद्यावर हात टाकून ‘ मित्रा, तू कसा आहेस?’ असा एक साधा, प्रांजळ प्रश्न आपण विचारु शकतो का, आणि त्या प्रश्नाला जी खरी उत्तरे मिळतील, ती तशीच्या तशी ऐकण्याची, समजून घेण्याची आपली तयारी असेल का?...” हाच विचार या अंकाची जुळवणी करताना त्यांनाही पडला होता. पुढे तर त्यांनी पुरुषांची एक वर्गवारीच दिली आहे. स्त्री पुरुष समानतेचे सूत्र समजून उमजून...