मंतरलेला इतिहास
खूपदा आपल्यासमोर इतिहासाची मांडणी एका इतिहासनायकाला केंद्रस्थानी ठेवून केलेली असते. त्यामुळे त्या नायकाच्या कर्तृत्वाला त्यात अधिक महत्त्व प्राप्त होतं. पण वि. का. राजवाडे म्हणतात, " केवळ मोठ्या माणसांची चरित्रे म्हणजे इतिहास नव्हे". अनेक लहान थोरांनी आपापल्या परीने कष्ट, हालअपेष्टा सोसून, मर्दुमकी गाजवत हा इतिहास घडवलेला असतो. शिवाय इतिहास हा केवळ स्वामीनिष्ठांचाच नसतो, जोडीला तो दगलबाज संधीसाधू सत्तापिपासूंचाही असतो. किती भोगी उद्दाम हापापलेले कुणी त्यागमुर्ती विरागी निराळे महाकाल हे सर्व पोटात घेतो तयांच्या कथांचा इतिहास होतो हे सूत्र हर्षद सरपोतदार लिखीत मंतरलेला इतिहास या पुस्तकात ठळकपणे जाणवतं. वेगवेगळ्या काळातील विविध व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या एकूण २४ लेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. अगदी ...