A Reader's Reflections
#पुस्तकांच्या_पानांवरुन जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतात. वाचन आणि वाचकांबद्दल सुध्दा असंच म्हणावं लागेल. प्रत्येकाची आवड, वाचायची पद्धत वेगवेगळी असू शकते. काही वाचक एकावेळी एकच पुस्तक वाचतात. काही at a time चार पाच पुस्तकं वाचत असतात. कुणाला कादंबरी आवडते, कुणाला चरित्र-आत्मचरित्रपर लिखाण आवडतं, कुणाला विनोदी तर कुणाला अध्यात्मिक विषयही आवडीचा असू शकतो. मला हेच पुस्तक का आवडतं, याला काही ठोस उत्तर असायलाच हवं असं नाही . काही पुस्तकं खूप नावाजलेली असतात, पण ते पुस्तक हौसेने वाचायला घ्यावं नी पत्ता चुकल्यासारखं वाटून जातं. तर कधी क्वचित निव्वळ योगायोगाने एखादं नेहमीच्या आपल्या आवडीच्या विषयांपेक्षा वेगळं पुस्तक वाचनात येतं आणि कायमचं तुमच्या मनात घर करुन जातं. आम्ही English Literature मधे उत्तम साहित्याचे गुण शिकलो होतो. Good literature is a literature which is universal, transcends the age in which it was created, plus which has multiple layers of meanings. तुम्हाला असा अनुभव आहे का, की एखादं पुस्तक तुम्ही पहि...