भारतीय मातृकथा ( खंड १,२,३,४)
नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गति: नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया || महाभारतातल्या शांतीपर्वात गौतम ऋषींचे पुत्र चिरकारी यांनी मातेचे गुणवर्णन करताना उद्धृत केलेला हा श्लोक म्हणजे आपल्या संस्कृतीत स्त्रीच्या प्रत्येक रुपाला दिलेली एक मानवंदना आहे. भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक धार्मिक पंथात स्त्रीला कायमच बरोबरीचा दर्जा देऊन तिच्या योगदानाची दखल घेतलेली दिसते. एक कन्या, भगिनी, पत्नी, माता, गृहस्वामिनी या पारंपरिक भूमिका बजावणाऱ्या स्त्रियांबरोबरच एक तपस्विनी,भक्त, विदुषी, वीरांगना, राज्ञी,नागरिक, समाजसेवक, सुधारक अशा अनेक भूमिकांत वावरत आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या स्त्रियांच्या अगणित कथा आपण आजवर ऐकल्या आहेत. लक्ष्मी- पार्वती- सरस्वती, पंचसती, महाकाव्यांतल्या अगणित स्त्रिया, ऋषीपत्नींच्या गोष्टी हा एका प्रकारे मूल्यसंस्कारच आहे. अशा अनेक मातांच्या गोष्टींचा हा संग्रह- भारतीय मातृकथा. कृष्णराव पंढरीनाथ देशपांडे आणि सुलभा देशपांडे लिखीत चार खंडांत विभागलेला हा स्त्रीशक्तीला समर्पित असलेला कथासंग्रह वेद-उपनिषद काळापासून ते आजपर्यंतच्या काळाला गवसणी घालत...