जेरुसलेम
पुस्तकांच्या_पानांवरून वर्ष २०२१: पर्ण आठवे गेल्या आठवड्यात मध्यपूर्व आशियाशी संबंधित दोन पुस्तकं वाचली. पहिलं पुस्तक आहे सायमन सीबग मांटफिऑरी यांनी लिहिलेलं आणि सविता दामले यांनी मराठीत अनुवादित केलेलं ' जेरुसलेम: एक चरित्रकथा' . सध्या कायम विवादात असलेलं जेरुसलेम म्हणजे ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम अशा तीनही धर्मांमधे एक पवित्र शहर, एक धर्मक्षेत्र म्हणून मान्यता पावलेलं आहे. ज्यू लोकांचं मूळ स्थान(Promised Land), तसेच ज्यू धर्मातलं सर्वोच्च पवित्र मानलं गेलेलं मुख्य धर्मस्थळ होली टेम्पल, जिथून जगाच्या रचनेचा पाया रचला गेला, जे देवाचं निवासस्थान आहे, Holy of Holies अशा मंदिराचं मूळ स्थान असलेली पश्चिम भिंत ( Western Wall) जेरुसलेम इथे आहे. राजा डेव्हिड (ख्रि.पू. १०१०-९७०) याने हे शहर जिंकून त्याला ज्यू साम्राज्याची राजधानी बनवलं. तर त्याचा मुलगा राजा सोलोमनने इथे ज्यू धर्माचं पहिलं तर राजा हेरड याने दुसरं Holy Temple बांधलं , असा इतिहास आहे. इस्लाम धर्मानुसार, प्रेषित मुहम्मद पैगंबरांनी मक्केहून रात्रीचा प्रवास करून इथे येऊन ज्या जागी प्रार्थना केली, ती जागा(Blessed Land of Qu...