पृथ्वीचे प्रेमगीत ( कुसुमाग्रज)
#eternal_व्हॅलेंटाईन_भाग_१ #platonic_love #मराठी_प्रेमगीत #रसग्रहण (लाईक नाही केलं तरी चालेल, पण शेवटपर्यंत वाचा) वेगवेगळया hypothesis चा आधार घेऊन इतकं खात्रीशीर सांगता येईल, की आपली पृथ्वी, सूर्य आणि इतर ग्रहांची उत्पत्ती एकाच स्त्रोतापासून झाली आहे. ४.५ बिलियन वर्षांपूर्वी सूर्यापासून वेगळी होऊन पृथ्वी आकारास आली. त्यानंतर तिचा उपग्रह चंद्र आणि इतर ग्रह अस्तित्वास आले. सूर्य, बुध (Mercury), शुक्र( Venus), पृथ्वी आणि तिचा उपग्रह चंद्र ( Earth &Moon), मंगळ( Mars), गुरु (Jupiter), शनी (Saturn), युरेनस ,नेपच्यून अशा क्रमाने आपली सूर्यमाला आकारास आली. आपली पृथ्वी साडेतेवीस अंशात सूर्याच्या बाजूने कललेली असून ती एकाच वेळी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते. सूर्य आणि पृथ्वी हे पूर्वी एकच असल्यामुळे पृथ्वी सुरुवातीला प्रचंड उष्ण होती, नंतरच्या काळात तिचं वातावरण मानवांना राहण्यायोग्य झालं. तरी अजूनही तिचं अंतरंग प्रचंड उष्ण आणि अस्थिर आहे, हे ज्वालामुखी, भूकंप या घटनांतून स्पष्ट होतं. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो,आणि त्याचा प्रकाश म्हणजे त्याच्या पृष्ठभागावरुन प्रवर्तित होणारी सुर्यकिरणं...