Posts

Showing posts from September, 2020

पुस्तक परिचय: पेशवाई

 'दुसरं काही वाचायला वेळच मिळत नाही ', ही तक्रार मी या जन्मात कधी करेन, असं वाटलं नव्हतं. पण गेले काही दिवस तसं झालं खरं. एक तर लायब्ररी बंद, आणि अमेझॉनच्या खोऱ्यातनं काही मागवावं, तर कोरोनाही नेमका भेटीदाखल हजर व्हायचा, ही भीती! आताच काही दिवसांपूर्वी तब्बल पाच महिन्यांनी पुन्हा ग्रंथालयात गेले. ती वास्तू, त्यातली पुस्तकं पाहून ' आजि म्या ब्रह्म पाहिले' असा आनंद झाला. यावेळी दोन अगदी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वाचायला मिळाली. पहिलं रवींद्र गुर्जर लिखित सत्तर दिवस आणि दुसरं कौस्तुभ कस्तुरे लिखित पेशवाई . सत्तर दिवस बद्दल लिहीनच, पण आत्ता पेशवाई बद्दल थोडंसं.  पुस्तक : पेशवाई लेखक: कौस्तुभ कस्तुरे प्रकाशक: राफ्टर पब्लिकेशन पृष्ठ संख्या: नक्की आठवत नाही, पण सर्वसाधारण वाचकांच्या आवाक्यातली आहे, हे महत्वाचं. किंमत: मी लोटीस्मामधून घेतलं असल्यामुळे मला निःशुल्क मिळालं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही!      मुळात पेशवाई या विषयावर सहज उपलब्ध होणारी आणि प्रसिद्ध असलेली पुस्तकं किंवा कादंबऱ्या म्हणजे रणजित देसाईंची स्वामी, ना सं इनामदार लिखित राऊ, झुंज, झेप आणि शिकस्...