Posts

Showing posts from 2025

वंदे गुरू परंपरा

Image
वैभवशाली सनातन परंपरेला समर्पित १० वर्षे एखाद्या YouTube channel ची दहा वर्षे पूर्ण झाली, याचा ते चॅनेल ज्याचं आहे तो सोडून बाकी कुणालाही मनापासून आनंद होणं ही एक फारच rare गोष्ट आहे. कारण आज हर तऱ्हेच्या content creators चा अगदी सुकाळू आहे. तुमची जी आवड असेल त्या दिशेने तुम्हाला अक्षरशः खेचून नेणारा content तुम्हाला इथे दिसेल. अशा काळात जो बिकता है वही यहा टिकता हैं असा अघोषित मूलमंत्र असणाऱ्या या माध्यमाचा विधायक कामासाठी वापर करुन नावारूपाला आलेलं चॅनेल म्हणजे कुलदीप मुरलीधर पै यांचं चॅनेल जे Vande Guru Parampara या spiritual music series साठी ओळखलं जातं.  मूळचे केरळचे कुलदीपजी भारतीय शास्त्रीय संगीतातले गोल्ड मेडलिस्ट आणि साउंड इंजिनियर आहेत. ते स्वतः व्हायोलिन, पियानो, मृदुंग, हार्मोनिअम, बासरी ही वाद्ये उत्तम वाजवतात. अद्वितीय या त्यांच्या अल्बममधे त्यांनी गायनाबरोबर व्हायोलिन, मृदंग, घटम, कांजिरा, तबला, हार्मोनियम आणि मेलोडिका या वाद्यांचं वादनही केलं आहे. पण २०१४- १५ पासून त्यांनी आपले गुरु स्वामी श्री रमणचरण तीर्थ यांच्या प्रेरणेतून सुरु केलेल्या ' वंदे गुरू पर...