Posts

Showing posts from April, 2020

एकश्लोकी रामायण आणि नाम रामायण

||एकश्लोकी रामायण आणि नाम रामायण || (आज रामनवमीच्या दिवशी जरा महाजालातून फिरून आले, तिथे हे नवं काहीतरी बघितलं. To be frank, मलाही हे आधी माहीत नव्हतं. पण ही अशी स्तोत्रं वगैरे मिळवून वाचायचा मला जाम छंद आहे. ज्यांना आवड आहे, ज्यांची श्रद्धा आहे, त्यांनी वाचा, नाहीतर आपकी मर्जी ! ) नामरामायणम् संस्कृतमध्ये ऋषी वाल्मीकि यांनी लिहिलेल्या महाकाव्य रामायणाची संकुचित आवृत्ती आहे. नामरामायणम हे वैष्णव संत श्री लक्ष्मणाचार्य यांनी रचले आहे. यामध्ये १०८ श्लोक असून पूर्ण रामायण प्रमाणेच नामरामायणमचे सात अध्याय आहेत, जे बाल कांड, अयोध्या कांड, अरण्य कांड, किश्किंधा कांड, सुंदर कांड, युद्ध कांड आणि उत्तरकांडमध्ये विभागले गेले आहेत. नाम रामायणम् दक्षिण भारतीय राज्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तामिळ नामरामायणम, तेलगू नाम रामायणम, कन्नड नामरामायण आणि मल्याळम नाम रामायणम अनुक्रमे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, कर्नाटक आणि केरळमध्ये खूप लोकप्रिय आहे. हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये रामचरितमानसाच्या लोकप्रियतेमुळे, नामा रामायणम् उत्तर भारतीय राज्यांमध्ये कमी लोकप्रिय आहेत. नामरामायण ही संत तुलसीदास...